सार्थकता
सार्थकता
------------
''दिन'' साजरे होती विविध
केवळ "जाणीव'' जागृतीसाठी ।
यत्न करूया आपण सारेजण
जाणीव "जिवंत" राहण्यासाठी।।
प्रतिदिन प्रतिक्षण प्रत्येकजण
स्मरणात ठेवील ही "जाणीव"।
यासाठी होतील त्या कृतीने
ते दिन सारे ''सार्थक" होती ।।
सार्थक व्हावे ते सारे ''दिन''
सार्थक व्हावी सारी जीवने
या मनःपूर्वक शुभेच्छा माझ्या
या "काव्यपंक्ती" सार्थक होती।।
वैद्य मनोज पाटील
दि.22मार्च 2022
(जागतिक जलदिन
Comments
Post a Comment