माती चे काम
लललै ललै ललै
लललै ललै लैलै।
लललै ललै ललै
लालै ललै ललै।।
जादू असेही माती
बिजास फळ बनविती।
पाण्यास शोषून घेती
ते पाणी "नदीस" देती ।।
उन्हात सावली ती
पक्षास घरटी ही ।
सर्वास आधार जी ती
त्या वृक्षास"आधार" देती।।
आरोग्य तिचे बिघडले
आमचेच हो चुकले।
निर्धार सुधारणेचा
करती तिचीच बाळे।।
आसमंतात विष वाढले
जी त्यालाही शोषून घेती।
त्या मातीस पोसती जे जे
मज प्रिय "मित्र" ते ते।।
(वैद्य मनोज पाटील.
21 मार्च (इक्विनॉक्स)
30 हजार किलोमीटर ची यात्रा
लंडन ते कावेरीखोरे पर्यंत
52 लाख शेतकऱ्यांचे जीवन कार्य-
जिथे 4 करोड 20 लाख वृक्षांचे रोपण झाले आहे,83 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्रावर.
192 देशांना जागवण्यासाठी...
Comments
Post a Comment