विश्वास
विश्वास
-----------
मी प्रत्येक वेळी विश्वास ठेवू शकत नाही इतिहासातल्या दाखल्यावर
पुस्तकातल्या वाक्यावर
किंवा वर्तमानपत्रातल्या बातमीवर!
माझा विश्वास बसतो माझ्या समोर असलेल्या व्यक्तीच्या नजरेतील विश्वासावर.
द्वेष पसरवण्याचे काम खूप जणांनी केले
अहंकाराचे असंख्य मिळाले दाखले
पूर्वग्रहांचे ओझे अनेक वर्षे वाहिले
या सगळ्यांना पुष्ट करणार्या
कुठल्याही साहित्यावर
मी विश्वास ठेवू शकत नाही.
माझा विश्वास बसतो
सद्गुन दर्शविणाऱ्या व्यवहारावर.
प्रेम पसरविण्याचे काम खूप जणांनी केले
विनम्रतेने अनेक जणांना जिंकले
विशाल रुदयाचे दाखले यांच्या व्यवहारानी दिले
दुःखितांचे दुःख निवारणया झिजले जे जे
हवा पाणी पृथ्वीला जपले जे जे
त्यांना मी जेव्हा जेव्हा पाहिले
विश्वास बसला त्यांच्यावर.
सद्गुणाच्या विनाशाला कारण बनणार असेल तर नकोच मला ते "सत्य"
सदाचारीला दुःख देणार असेल तर..
नकोच मला तो "धर्म"
प्रामाणिक परिश्रमावर वरवंटा फिरवणारा
नकोच मला तो "कायदा"
वेदनेवर फुंकर घालणारे जे जे काही...
माझा विश्वास त्याच्यावर.
कोणाच्यातरी मूलभूत अधिकाराना तिलांजली देऊन कोणते विशेषाधिकार नकोत मला.
विकासाला खीळ घालणारे,
देशहिताला धाब्यावर बसवणारे
कोणते अधिकार सुद्धा नको मला.
त्याग- प्रेम- सेवा हे ज्यांचे सूत्र
विश्वास माझा त्याच्यावर.
-डॉ मनोज पाटील
Comments
Post a Comment