संयुक्त उपचार :- रुग्णाच्या प्रकृतीचा विचार

संयुक्त उपचार :- रुग्णाच्या प्रकृतीचा विचार
------------------------------------------------------

एखाद्या रुग्णाला एखादे औषध चालत नाही. त्याला हाइपर्सेंसितिविटी रिअक्शन येते. कुठल्याही डॉक्टरने त्याला ते औषध देऊ नये. यासाठी त्यासंबंधीची महिती रुग्णाने स्वतःजवळ व्यवस्थित नोंद करून ठेवायची पद्धत आहे.
जगातल्या असंख्य लोकांना चालतं, तरीसुद्धा ते औषध ' या ' रुग्णाला चालत नाही, म्हणून ही उपाय योजना असते. हे आपल्याला माहीत आहे.

व्यक्ती भिन्नतेमुळे उपचार देताना सुद्धा विचार वेगळा करावा लागतो. पूर्वीच्या काळी केलेल्या एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप कोणता यावरून त्याला कोणता आजार होण्याची शक्यता आहे? या संबंधी काही माहिती देण्यात आली होती.

व्यक्तीची पर्सनालिटीचा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा प्रकार कोणता? या वरून सुद्धा त्या व्यक्तीला डायबिटीस, हायपरटेन्शन यासारखे आजार होण्याची शक्यता किती? हे सांगितले जाते.
टाईप - वन पर्सनालिटी, टाईप - टू पर्सनालिटी करून त्यांची एंग्जायटी लेव्हल किती? हे सुद्धा ठरवले जाते. ती व्यक्ती आजारामध्ये अथवा एखाद्या उपचारांमध्ये होऊ शकेल यासंबंधी सांगितले जाते. कधीकधी उपचार करताना सुद्धा या मुद्द्यांचा विचार केला जातो. विशेषतः कॅन्सरचा उपचार करताना याचा विचार खूपच महत्त्वाचा आहे.

होमिओपॅथीमध्ये 'कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज ' असा एक प्रकार आहे. हे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कोणतं? ते पाहून व्यक्तीमत्वाला सुयोग्य अशी औषधी योजना केली जाते. त्या व्यक्तिमत्त्वामध्ये आढळणारे अनेक आजार आपोआप कमी होतात असं मानलं जातं. अनेक रुग्णांना तसा अनुभव सुद्धा येतो. रुग्णाने आपल्या आजाराबद्दल सांगितलेले असते किंवा सांगितलेले नसते पण तरीसुद्धा उपचार होऊन जातो.

आयुर्वेदामध्ये "प्रकृती "  हा एक शब्द आहे. रुग्णाच्या उपचारांमध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोगी व्यक्तीची "परीक्षा" करत असताना ज्या दहा गोष्टी पाहिल्या जातात, त्यापैकी त्या व्यक्तीची प्रकृती हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 
"प्रकृती " हा शब्द इथे त्याचा '' स्वभाव '' अशा अर्थाने घेतला जातो. तो ' शारीरिक स्वभाव' असू शकतो 'मानसिक स्वभाव' असू शकतो अथवा  'अध्यात्मिक स्वभाव' सुद्धा असू शकतो. आयुर्वेदानुसार व्यक्तीची प्रकृती आईच्या गर्भामध्ये निश्चित होते. त्याचे सात प्रकार करण्यात आले आहेत.

उदाहरणार्थ वात प्रकृती चा रुग्ण आहे, वाताचा  व्याधी झाला आहे, आणि वातप्रकृती चा काळ सुद्धा आहे, अशा परिस्थितीत एक मार्गी वाताची चिकित्सा केली असता उपचार करणे सोपे जाते. कारण येथे काही कॉम्प्लिकेशनच नाही! 
जर पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे, त्याला कफाचा आजार झाला आहे, अशा स्थितीमध्ये त्याचा कफाचा उपचार करण्यासाठी उष्ण पदार्थाचा वापर करायचा म्हटले तर त्याचा पित्तप्रकृती चा विचार करावा लागतो. थोडी सौम्य औषधे निवडावी लागतात, किंवा वेगळी औषधे निवडावी लागतात. मग कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लिकेशन न होता त्या ग्रुपला चा कफाचा आजार बरा होतो. 
त्या उलट या प्रकृतीचा विचार केलाच केला नाही तर, कफाचा उपचार करताना दिलेल्या उष्ण औषधांमुळे त्या रुग्णाच्या पित्त आणखी वाढून कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात. प्रकृतीचा विचार केला तर हे कॉम्प्लिकेशन टाळता येतात. कफ प्रकृती असलेल्या माणसाला कफ स्वरूपाचा डायबेटिस सारखा आजार् झाला तर तो सहजपणे बरा होतो , पित्त प्रकाराचा डायबिटीस सारखा आजार झाला तर तो थोड्या अधिक प्रयत्नाने बरा होतो आणि वात प्रकाराचा डायबेटीस  झाला असेल तर तो बरा होणे कठीण असते ,असे सांगितले आहे. हा भेद जर समजला तर मॅनेज करणे किती सोपे जाते बरे! नाहीतर डायबेटिस झाला म्हणजे "आयुष्यभर गोळ्या आणि कॉम्प्लिकेशन्स!" याच्या भीतीनेच माणूस गरद होतो, हे टाळणे शक्य आहे ... अशी असंख्य उदाहरणे देता येतील. प्रकृतीचे परमुटेशन्स अंड कंबिनेशन्स काय कमी असतात?

विश्लेषण अधिकाधिक खोलवर केले असता व्यक्ती तितक्या प्रकृती अशीसुद्धा प्रचिती येते. त्याला शास्त्र आधार सुद्धा आहे. हे शास्त्र विकसित झाले. या शास्त्राचा अवलंब अनेक वर्षे होत राहिला. असंख्य वैद्याने त्याचा अनुभव घेतला. अनेक विद्वान आणि त्याच्यावरती आपले आपले विश्लेषण लिहून सुद्धा ठेवले. आजच्या काळामध्ये जल का चा उपयोग त्याची शहानिशा करून का होईना करायला काय हरकत आहे?
कोरोणाच्या काळामध्ये विशेष करून उपचाराचा प्रोटोकॉल पाळण्यात आला. त्या प्रोटोकॉल मुळे रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना किती त्रास झाला आहे ,याचा अनुभव सगळ्यांच्या मनामध्ये ताजा आहे.

 जिथे प्रोटोकॉल असून सुद्धा व्यक्‍तीच्या प्रकृतीचा विचार करण्यात आला आणि त्यानुसार उपचार करण्यात आहे. अशाच जागरूक केंद्रामध्ये आणि अशा जागृक केंद्रांमधील जागरुक डॉक्टरांच्या आणि जागरूक सहाय्यक आणि परिचारकांच्या कार्यकुशलतेमुळे उपचारामध्ये अधिक प्रमाणात यश प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.
आयुर्वेद, होमिओपॅथी आणि अन्य उपचार पद्धती मध्ये या विषयाचा जितका म्हणून अभ्यास झाला आहे, त्या अभ्यासाचा उपयोग प्रचलित उपचार पद्धती मध्ये उपयोग  करून घेतला असता आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे उपचारामध्ये यश मिळवता येऊ शकते यात शंकाच नाही.

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)