संयुक्त उपचार लेखांक ३
आमवात, संधिवात आणि संयुक्त उपचार
--------------------------------------------------
र्हुमेटॉइड अर्थराइटिस अशा नावाने एक अत्यंत त्रासदायक आजार समाजामध्ये सर्वत्र दिसून येतो. भारतामध्ये त्याचा प्रसार सर्व राज्यांमध्ये पाहायला मिळतो. वयाच्या विशीपासून साठीपर्यंत कोणालाही हा आजार होऊ शकतो. साठीनंतर हा आजार रुग्णाला आणि रुग्णांच्या नातेवाईकांना ही खूपच त्रासदायक ठरतो. स्त्रियांच्यामध्ये पुरुषांच्यापेक्षा तुलनेने अधिक प्रमाणात दिसून येते.
या आजारामध्ये रुग्णांचे सांधे दुखत असतात. काही प्रमाणात सूज सुद्धा आढळते. सकाळच्या वेळी, थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात ,आकाशामध्ये ढग आले तर वेदनेचे प्रमाण वाढते.
आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार रक्तामध्ये र्हुमॅटीक फॅक्टर वाढणे हे याचे चिन्ह समजले जाते. रक्ताची सीबीसी नावाची चाचणी केली तर त्यामध्ये ई एस आर वाढलेला दिसून येतो.
आयुर्वेदामध्ये प्राथमिक अवस्थेत याला "आमवात" असे म्हणतात आणि तो गंभीर झाला म्हणजे त्याला संधिवात असे म्हणतात. गंभीर स्थितीमध्ये सांधे वाकडे सुद्धा होतात.
आयुर्वेदामध्ये या आजाराचे मूळ पचनसंस्थेचे विकार यामध्ये आहे असे मानले जाते. पचनसंस्था का बिघडली? याचाही सर्वंकष विचार आयुर्वेदाने केलेला आहे. खाल्लेले अन्न पचन्यापुर्वी आणखी काही तरी खाणे, वेळी-अवेळी खाणे आपल्याला पटते की नाही याचा विचार न करता खाणे, दुपारी झोपणे, रात्री जागरण करणे ,मानसिक ताण, तणाव ,चिंता ,मनाला व्यक्त होऊ न देता भावना दबवणे, अशा कारणांचाही विचार झालेला दिसतो.
अलीकडच्या काळामध्ये फास्टफूडचा वापर , गादी, पंखा यासारख्या ऐषआरामाच्या वस्तू हेसुद्धा पचन नीट न होण्याचे कारण आहे.अशा सवयी असलेल्या लोकां मध्ये हा रोग झालेला दिसून येतो.
त्याच्या उपचारांमध्ये आधुनिक औषधांपैकी वेदनाशामक औषधे, स्टिरॉईड्स, ऑंटी मलेरियल आणि मीथोत्रिक्झेट सारखे अँटीकॅन्सर ड्रग्स यांचा वापर झालेला दिसून येतो. त्याचा गुणही चांगला येतो. पण तात्पुरता!
परंतु आयुर्वेद ज्याप्रमाणे आजाराच्या कारणांचा विचार करून नष्ट करण्याचा सल्ला देते.त्याप्रमाणे उपचार पद्धती अवलंबली तर फारशी अपायकारक नसलेली औषधे उपयुक्त ठरतात. घरातील सुंठ ,गूळ ,डिंक आणि गरम पाणी ,गरम कपडे, गरम उपचार च्या माध्यमातून याच्यावर मात सुद्धा करता येते. वैद्य्यांच्याकडून उपचार घ्यायचे म्हटले तर रासनादि काढा ,सिंहनाद गुग्गुळ ही औषधे उपयोगी पडतात आणि या औषधांना साइड इफेक्ट्स जवळजवळ नसतात. रुग्णाची प्रकृती आणि हवामानाचा विचार करून या औषधांचा उपयोग करावे लागते इतकेच!
या निमित्ताने आजारांच्या मूळ कारणांकडे बघण्याची एक नवी दृष्टी असावी असा एक संकेत मिळतो. "मूळ कारण'" याचा अर्थ, शरीरामध्ये घडणारे बदल ,ते कोणत्या पेशीमध्ये घडले? ते कोणत्या कारणाने घडले? त्या घडलेल्या बदलाचा परिणाम म्हणून शरीरामध्ये आणखी काय घडले? याचा अभ्यास आधुनिक विज्ञान अत्यंत उत्तम प्रकारे करते. पण याची व्यवहारातली कारणे रूग्णाच्या जीवनशैलीतील कारणे ऋतूमान, परिसर, मानसिक स्थिती आणि व्यवसाय यांची कारणे सुद्धा शोधून त्या अनुषंगाने सल्ला देण्याची संधी आयुर्वेद आपल्याला देते. साध्या बोली भाषेत त्याला पथ्य वगैरे म्हणतात. 'पथो अनपेतम पथ्यम्।' असे एक सूत्र आहे. त्यानुसार रुग्णासाठी जे अनुकूल आहे त्याला पथ्य असे म्हणतात आणि जे प्रतिकूल आहे त्याला अपत्य असे म्हणतात.
शरीरामध्ये बदल होण्यासाठी कारणीभूत असलेली दिनचर्येमधील घटक कोणते? याचा अभ्यास व्यवस्थित झाला तर रुग्णाला त्याअनुषंगाने सल्ला देणे सहज शक्य होते. त्या सल्ल्याचे पालन व्यवस्थित झाले तर रोग वाढण्याला अटकाव होतो . रोग आटोक्यात आणण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. आणि या पथ्यापथ्याचा विचार केल्यामुळे रुग्णाचा काही आर्थिक नुकसान मुळीच होत नाही. उलट फायदाच होतो. त्याला बरे करण्यासाठी उपयुक्त असलेले साधन नव्हे काय?
आमवात व संधीवाताचा बाबतीत तर याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
शरीरातील पेशींच्या पातळीवर होणारे बदल आणि त्या बदलांना यासाठी लागणाऱ्या औषधांचा शोध व्हायलाच हवा. त्यांचा वापर व्हायलाही हरकत नाही .पण त्यांचे साईड-इफेक्ट व्हायला नको. आणि त्याच वेळी रुग्णांचा खर्च वाचवणारे, आजार पुन्हा न होण्यासाठी उपयुक्त ठरणारे असे पथ्य-अपथ्य चे सूत्र उपचार पद्धती मध्ये कमी-जास्त प्रमाणात आजही वापरले जाते तर ते अधिक शास्त्रोक्त पद्धतीने वापरण्याचा सूत्र आयुर्वेदामुळे आपल्याला मिळते.
म्हणजे आजाराचा अटकाव करणे आणि आजाराचा उपचार करणे ह्या दोन्ही गोष्टी संयुक्त उपचार पद्धतीचा वापर केल्यामुळे अधिक सोप्या आणि कमी खर्चाच्या होऊ शकतात.
उपचारांमध्ये वेळ झाला. गुडघ्यासारखे सांधे फारच कुचकामी झाले तर गुडघे बदलाची शस्त्रक्रिया आधुनिक पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने करता येते .
संधीवाताचा आजार शरीरातल्या अन्य सांध्यांमध्ये पसरणार नाही, त्वचा मांस यांची शक्ती नष्ट करणार नाही यासाठी जर आधी माणसाच्या जीवनशैलीवर परिणाम करणार नाही. हेही साधायचे असेल तर संयुक्त उपचार पद्धतीचा आवश्य विचार व्हायला हवा.
Comments
Post a Comment