कोलाज
कोलाज आपल्या जीवनाचे
--------------------------------
कागदाचे कपटे
पडलेले इकडे तिकडे
विविध आकारांचे विविध रंगांचे.
घेऊन सारे तुकडे
चित्र एक बनवायचे .
त्याला "कोलाज चित्र" म्हणायचे
आयुष्य सुद्धा असेच...
विविध माणसे ,विविध घटना
काही आवडते, काहीं नावडते !
जे आहे ते ते सारे ,येथे घडते ते ते सारे
सारे घेऊन चित्र बनवायचे .
त्याला 'आयुष्याचे चित्र' म्हणायचे!
चित्रांचे या परिणाम वेगळेवेगळे...
काही नजरेसाठी सुखद,
तर काही मनासाठी प्रेरक!
काही संदेश देणारे, कांही आनंद देणारी चित्रे !
पण हे चित्र खास आयुष्याचे...
आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी
आनंदाचे आणि उपयोगाचे
त्याला म्हणावे " आयुष्याचे कोलाज!"
...कोलाज आपल्या जीवनाचे!!
डॉ मनोज पाटील
२/८/२१
Comments
Post a Comment