Matter of health after 45



माननीय आयुक्त यांच्या घरी काल रात्री झालेल्या भेटी संबंधी व्हाट्सअप संदेशाचे लेखन आणि संप्रेषण माननीय सयाजी शिंदे आदींच्या कडे सकाळी उठल्याबरोबर झाले.
जाग आल्यापासून सर्वांगामध्ये व्यायामाची खुमखुमी होती बाहेर पाहतो तर पाऊस पडत होता. आताशी खुमखुमी दबून जाणार की काय अशी भीती वाटू लागली. चिरंजीव पारस समोर तसे बोलून दाखवले तर त्याने चॅलेंज केले, “ मग पावसात जायचे!”

वा,छानच संधी होतीथोडसा थोडे वॉकिंग .. भरपूर जॉगिंग... त्यानंतर थोडे वार्मिंग अप् ...फास्ट रनिंग.. शेवटी कूलिंग डाऊन आणि स्ट्रेचिंग सारे सारे झाले.

तीर्थरूप आईच्या सांगण्यावरून नवीनच तयार केलेल्या व्यवस्थेमध्ये मातीची पूर्तता केली आणि दोडका,कारली आणि दुधी भोपळ्याच्या बिया टोकल्या.

आंघोळीला गरम पाणी दिले होते पण तरीसुद्धा गार पाण्यानेच मनसोक्त आंघोळ केली. अजूनही उनाडकी कमी झाली नव्हती .शिरगावला शेतावरती शेंगा च्या बिया घेऊन जाण्यासाठी तयार होतो. बाबांना आश्चर्य वाटत होते पण सौभाग्यवती ला राग येत होता सगळ्याच गोष्टी चे मन मजा घेत होते... अशी सगळी उनाडकी ची सकाळ !

यानिमित्ताने थोडस गंभीर परंतु अत्यंत महत्त्वाचा विषय...
संसाराचा आणि व्यवसायाचा गाडा हाकता हाकता 
वयाची पंचेचाळीस वर्षे पूर्ण झालेली...
शरीराकडे लक्ष देणे जमतेच असे नाही.

पण ही वेळ मात्र अत्यंत महत्त्वाची!

इथून पुढे खरी आवश्यकता असते निरोगी,निरामय जीवनाची!

जगण्यासाठी साधनांची पूर्तता असली काय?
आणि काही स्वप्नांची अपूर्णता असली काय?
विचारांमध्ये आणि व्यवहारांमध्ये प्रगल्भता आलेली
असली काय आणि नसली काय?
जीवनाचे नवे पर्व सुरू होते हे खरे!
हे पर्व सुखाचे समाधानाचे शांतीचे जायचे असेल तर आरोग्याची महत्ता खूपच!

अनुभवावरून असे वाटते  की ,
व्यायामासाठी थोडा अधिक वेळ द्यायला लागतो.
खूप ताकदीचे व्यायाम करू नयेत.
व्यायाम करताना मित्रमंडळींची संगत खुप मोलाची.
त्यामुळे आणखी थोडा वेळ अधिक लागला तर हरकत नाही.

म्हणून आता व्यायामासाठी "एक तास" काढावा असे म्हणू नये तर "दोन तास " काढावेत असे म्हणावे. 

सुरुवातीला थोडेसे स्टार्टअप स्ट्रेचिंग... मग थोडे वॉकिंग .. भरपूर जॉगिंग... त्यानंतर थोडे वार्मिंग अप् ...फास्ट रनिंग.. शेवटी कूलिंग डाऊन आणि शेवटी मनसोक्त स्ट्रेचिंग ... हे करता करता गप्पा मस्ती आणि चेष्टा मस्करी सुद्धा सारे सारे आवश्यकच!

... अत्यंत गांभीर्याने विचार करायचा आणि तितक्याच गांभीर्याने अमलात आणायचा विषय!

समझदार को इशारा काफी है ।

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)