ईकोब्रिक्स
इको ब्रिक्स अभियान...संकल्प... उद्घाटन!
------------------------------------------------------
(हिंदी भाषांतर के साथ)
एक कार्यकर्ता मित्राच्या घरी जातो. दरवाजाची बेल वाजवितो. जोपर्यंत आतून दरवाजा उघडला जात नाही तोपर्यंत दरवाजाच्या बाजूला असलेल्या डक्ट मध्ये कार्यकर्त्याचे लक्ष जाते.. ..एक मोकळी पाण्याची बाटली आणि थोडे प्लास्टिक तिथे पडलेले असते.... कार्यकर्ता डक्ट मध्ये उडी मारतो.... तिथे जमलेले प्लास्टिक, बाटली मध्ये भरतो.... तोपर्यंत दरवाजा उघडतो.
दरवाजा उघडणारा मित्र , त्याच्यावर एक स्मितहास्य फेकतो .प्रतिउत्तर म्हणून कार्यकर्ता ही मनापासून हसतो.
मित्राबरोबर बोलणे झाल्यावर प्लास्टिक ने अर्धी भरलेली बाटली मित्राला भेट करतो.
" आता उरलेले काम मी पूर्ण करतो ",तो मित्र संकल्प करतो.
मित्राची पत्नी म्हणते ,"हो हो ...आम्ही पूर्ण करतो". मित्राचा मुलगा म्हणतो," आम्ही आमच्या सगळ्या मित्रांना ही सांगतो."
घरोघरी इको ब्रिक....।
बुद्धिवंतांची मस्त क्लिक।।
***
एक दिवस सकाळच्या वेळी हा कार्यकर्ता हरीपूरच्या संगमावर जातो. तेथे त्याला काही पाण्याचा बाटल्या आणि बरेचसे प्लास्टिक पसरलेले दिसते. थोडा व्यायाम करता करता तिथे आलेल्या आणखी दोन छोट्या मित्रांशी मैत्री होते. व्यायाम झाल्यानंतर त्यांच्यापुढे इको ब्रिकची संकल्पना ठेवले जाते.
मुले तयार होतात.
पंधरा-वीस मिनिटांमध्ये नदीच्या काठावर पसरलेले सगळे प्लास्टिक त्या चार बाटल्यांमध्ये बंद होते. आनंदाने त्या मुलांचे फोटोसेशन होते आणि इकोब्रेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून पुढे चालू राहतो.
***
कार्यकर्त्याच्या शेजारी एक मेडिकल दुकान असते. मागील दोन प्रसंगांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याचे धाडस वाढलेले असते. तो दुकानदाराला विनंती करतो. इकोब्रिक संबंधातल्या सर्व गोष्टी पटल्यानंतर तोही हा उपक्रम पुढे नेण्यासाठी तयार होतो.
***
ही मालिका अशा अनुभवांची अखंड पणे पुढे चालली आहे.
***
हे सगळे सुरू झाले खरे!पण गोळा झालेल्या इको ब्रिक्सचे करायचे काय?
या प्रश्नाचे उत्तर सुद्धा लगेच सापडते :-
समोरच एक बगीचा आहे. बगीच्या आणि रस्त्याच्या मध्ये छोटेसे कंपाऊंड आहे. कंपाऊंडच्या दोन खांबांच्या मधला भाग केवळ दोन सळ्या टाकून व्यापला आहे. आता तिथे या इको ब्रिक्स पासून एक भिंत तयार होईल. ती भिंत सर्वांना दिसेल. इको ब्रिक्स चा उपयोग झालेला सुद्धा दिसेल. आणि या मोहिमेला गती येईल.
***
*इको ब्रिक*
हे काय आहे?
हे आहे *"इको ब्रिक" म्हणजे पर्यावरणपूरक वीट!"* म्हणजे कचऱ्यापासून बनवलेली बहु उपयोगी वीट!!
पॉलिथिन पिशव्या, अल्युमिनियम फॉईल यांचा पुन्हा पुन्हा वापर करणे, आपल्याला माहीतच आहे. पण ज्या प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हा वापर करणे शक्य नाही ते प्लास्टिक, फॉईल, शाम्पू चे सॅशेट इ.कोठे टाकणार?
*"प्लास्टिक म्हणजे राक्षस"* हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे. याच राक्षसास बाटलीमध्ये बंद करून ठेवणे आहे.
तुम्हाला माहिती आहे का? या बाटली मध्ये दोनशे ते पाचशे प्लास्टिकच्या पिशव्या बसू शकतात.
त्या जर इतरत्र पडल्या असत्या तर किती घाण निर्माण झाली असती, आपली वसुधा खराब झाली असती? किती पशूंच्या जीवनाला धोका निर्माण झाला असता?
हे सर्व प्लास्टिक इको ब्रिक मुळे ते आता दोन बाय दोन इंचाच्या जागेच सामावले आहे. कुचुन कुचुन भरल्यानंतर ही बाटली वीट म्हणून वापरता येऊ शकते. अजून ही खूप उपयोग आहेत.
करणार ना मग आपल्याही घरी? आपल्या पुढच्या पिढीला आवडीचे काम? त्यांच्यासाठी शाब्बासकी चे निमित्त.
"पर्यावरणाचा स्नेह हवा असेल
आपल्या पुढच्या पिढयांना।
तर पर्यावरणस्नेही बनावे लागेल
आत्ताच आपणा सर्वाना ॥''
***
इको ब्रिक्स कसे बनवावे ?
1. कोरड्या बाटलीमध्ये भरून बनवावे.
2. त्यामध्ये भरावयाचे प्लास्टिक सुद्धा कोरडे असावे.
3. जे प्लास्टिक आपण पुन्हा वापरणार नाही किंवा रिसायकलिंग साठी देणार नाही अशा प्लास्टिकचा प्राधान्याने वापर करावा.
४. मोठ्या प्लास्टीकचे छोटे छोटे तुकडे करून त्यात घालावे.
५. सळईने कुठून कुठून घट्टपणे भरावे.
६.फक्त घरातीलच नावे तर परिसरातील प्लास्टिक सुद्धा गोळा करून घालायला हरकत नाही.
७. सार्वजनिक ठिकाणी गटागटाने मोहीम काढून हा उपक्रम करता येऊ शकेल.
***
इको ब्रिक्स बनविण्याचे फायदे:-
१. इतस्ततः पडलेल्या प्लास्टिकच्या/ पाण्याच्या बाटल्यांचा योग्य वापर होतो.
२. मोठ्या संख्येने(३००-४००) प्लास्टिक बाटलीमध्ये बंद होते.
३. एका बाटलीमध्ये भरलेले प्लास्टिक शंभर स्क्वेअर फुट इतक्या जमिनीला खराब करण्यापासून वाचवीते.
४. जमीन खराब होणार नाही
५.नाले तुंबणार नाहीत.
६.प्राणी प्लास्टिक खाऊन मरणार नाहीत.
७.तळी खराब होणार नाहीत.
८.नद्या प्रदूषित होण्याचे एक मोठे कारण नियंत्रित होईल.
९.समुद्र ,समुद्रामधील मासे आणि समुद्र तळाशी असणारे जीव, वनस्पती आदी नष्ट होणार नाहीत.
१०. जमीन खराब झाल्यामुळे प्लास्टिकचे अंश अन्न व फळांचा मध्ये दिसून येऊ लागले आहेत त्याला आता पाय बंद होईल.
११. अत्यंत सोपे काम आहे. घरातील मोठी माणसे, महिला आणि बालक सर्वांना करणे शक्य आहे.
१२. यात कोणताही खर्च करावा लागत नाही.
१३. घरातच तयार करून घरातच वापर करणे शक्य आहे.
१४. सौंदर्यवर्धन करणाऱ्या गोष्टी बनवता येऊ शकतात.
१५. उपयोगी पडणाऱ्या गोष्टी बनवता येऊ शकतात.
१६. पर्याय ठरू शकतील अशा गोष्टी बनवता येऊ शकतात.
१७. जमीन आणि पाण्याबरोबरच हवेत पसरणारे दुर्गंधी सुद्धा कमी होते.
दीर्घकालीन फायदे:-
१८. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त पाऊल आहे.
१९. पर्यावरण विषयक जागृत समाज निर्माण करण्यासाठी एक उत्तम निमित्त.
२०. आपला समाज संपूर्णपणे पर्यावरण जागृत होईपर्यंत आणि आपल्या व्यवस्थां आणि उद्योग जगतामध्ये प्लास्टिक वर प्रक्रिया करण्याचा सर्वोत्तम पर्याय आणि पुरेशी यंत्रणा निर्माण होई पर्यंत हा एक उत्तम उपलब्ध पर्याय आहे.
***
गोळा झालेल्या इको ब्रिक्स पासून काय काय करता येऊ शकते?
१. घरातच सौंदर्यवर्धन करणाऱ्या वस्तू बनवता येऊ शकतात.
२. घरगुती फर्निचर बनवता येऊ शकते.
३. घरच्या बागेमध्ये गार्डन टाइम्स म्हणून याचा वापर करता येतो.
४. सार्वजनिक बागेमध्ये बसण्यासाठी बाग तयार करता येतात.
५. घर अथवा बगीचा किंवा चौक येथे आकर्षक शिल्प बनवता येऊ शकतात.
***
उदाहरणे:-
१. कंपाऊंडच्या भिंतीमध्ये डेकोरेशन ची जाळी बनविताना याचा वापर केलेला आहे.
२.पॉलिसी रिसर्च फाउंडेशन दिल्ली यांनी घरगुती फर्निचर तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
३. हुबळी शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी हाच पर्याय निवडला आहे.
४. डेहराडून मध्ये इको ब्रिक्स वापरून एका पूर्ण बगीचा चे बांधकाम केले आहे.
५. मध्यप्रदेशात फुटपाथच्या बाजूला ब्लॉक्स म्हणून याचा वापर केला आहे.
६. हरियाणामध्ये एका पूर्ण भरलेल्या इको ब्रिक्स च्या बदल्यात तीन कापडी पिशव्या खरेदीसाठी देण्याची योजना चालते.
***
एक अत्यंत महत्वाचे निवेदन :-
कोणत्याही कचऱ्याचे व्यवस्थापन पण करताना,
विशेषतः घातक कचऱ्याच्या बाबतीत...
सर्वात पहिली पायरी आहे "रिफ्युज" म्हणजे पूर्णपणे नकारा.
दुसरी पायरी आहे" रिड्यूस" कमीत कमी वापरा.
तिसरी पायरी आहे" रियुज" म्हणजे पुन्हा पुन्हा वापरा.
चौथी पायरी आहे "रिसायकल" म्हणजे परिवर्तन करून वापरा.
इको ब्रिक्स चा पर्याय हा तिसर्या आणि चौथ्या पायरीच्या मध्ये येतो. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये अमलात आणण्यास सारखा सर्वोत्तम उपलब्ध पर्याय दिसतो आहे.
***
आता आपल्या सर्वांसाठी एकच प्रश्न आहे:-
आपण समस्या वाढविण्यामध्ये भाग घेणार?
की
आपण उपाय करण्यामध्ये भाग घेणार?
इको ब्रिक्स अभियान ... ... संकल्प की शुरुआत !
एक कार्यकर्ता अपने एक मित्र के घर जाता है। दरवाजे की घंटी बजाता है। दरवाजा खुलने तक कार्यकर्ता का ध्यान दरवाजे के समीप डक्ट के अंदर जाता है .. वहां पानी की एक खाली बोतल और थोड़ा प्लास्टिक पडा हुआ था .... कार्यकर्ता डक्ट में जल्दि से जाता (कूदता) है .... वहां पडे हुआ प्लास्टिक को बोतल में भरता है ...तभी दरवाजा खुलता है।
दरवाजा खोलनेवाला मित्र मुझे देखकर मुस्कुरता है। जवाब में कार्यकर्ता भी दिल से हंसता है।
बातचीत खत्म होने के बाद कार्यकर्ता अपने दोस्त को प्लास्टिक से आधी भरी बोतल भेंट करता है।
“अब मैं बचे हुए काम को पूरा करूंगा”, उसके दोस्त ने कहा। मित्र की पत्नी भी कहती है, “हाँ हाँ हम करते हैं”। मित्र का बेटा भी कहता है, “हम अपने सभी दोस्तों को भी यह बताते हैं” ।
घर-घर में इको ब्रिक
बुद्धिमानों के मस्त क्लिक
******
एक दिन वह कार्यकर्ता सुबह के समय हरिपुर के संगम पर जाता है। वहां उसे कुछ पानी के बोतल और बहुत सा प्लास्टिक, इधर उधर बिखरा हुआ दिखा। व्यायाम करते-करते वहां आए हुए उम्र में छोटे दो लोगों से मित्रता होती है। व्यायाम समाप्त होने के बाद उनके सामने इको ब्रिक की अवधारणा रखी जाती है। वे बच्चे तैयार हो जाते हैं।
पंद्रह से बीस मिनट में नदी के किनारे बिखरे हुए सभी प्लास्टिक उन चार बोतलों में बंद हो जाते हैं। खुशी के मौके पर उन बच्चों का फोटो सेशन होता है और इको ब्रिक अभियान उन के माध्यम से आगे जारी रहता है।
******
कार्यकर्ता के पड़ोस में एक दवा की दुकान है। पिछ्ले दोनों मौकों पर अच्छी प्रतिक्रिया मिलने के कारण कार्यकर्ता की हिम्मत बढ़ गई थी। वह इस संदर्भ में दुकानदार से विनती करता है। इको ब्रिक अभियान के संबंध में सभी जानकारियों से संतुष्ट होकर दुकानदार इस अभियान को आगे बढ़ाने के लिए तैयार हो जाता है।
******
यह सिलसिला इसी प्रकार के अनुभवों के साथ नियमित रूप से जारी है।
******
यह शुरू तो हो चुका था लेकिन जमा किए गए इको ब्रिक्स का करना क्या है? इस प्रश्न का उत्तर भी तुरंत मिल गया।
सामने ही एक बगीचा है। बगीचा और रास्ते के बीच में छोटा सा कंपाउंड है। कंपाउंड के दो खंभों के बीच के भाग में केवल दो सरिया लगाया गया है। अब यहां इस इको ब्रिक्स से एक दीवार बनाई जाएगी। वह सब को दिखेगा। इको ब्रिक्स का किया गया उपयोग भी दिखेगा और इस अभियान को गति भी मिलेगी।
******
इको ब्रिक
यह क्या है?
इको ब्रिक मतलब पर्यावरण पूरक ईंट! इसका मतलब है कूड़ा-कचरा से बनाया गया बहूपयोगी ईंट!
पॉलिथीन की थैली, एल्यूमीनियम पन्नी का बार-बार प्रयोग करना हम जानते हैं। लेकिन जिन प्लास्टिक की थैलियों का पुन: उपयोग नहीं किया जा सकता है, उन प्लास्टिक , पन्नी , शैम्पू के पाउच आदि को कहां रखा जाए?
हम यह भी जानते हैं कि " प्लास्टिक एक राक्षस है " । उसी राक्षस को बोतल में बंद करके रखना है।
आपको पता है ? इस बोतल में दो सौ से पांच सौ प्लास्टिक बैग रखा जा सकता है।
अगर वे कहीं और गिर गए होते, तो कितनी गंदगी पैदा हो जाती और हमारी पृथ्वी को नुकसान होता ? कितने पशुओं के जीवन पर खतरा निर्माण हो गया होता ?
ये सभी प्लास्टिक, इको ब्रिक के कारण अब केवल दो इंच गुणा दो इंच के आकार में समा गए हैं। ठूस-ठूस कर भरने के बाद इस बोतल को ईंट के रूप में इस्तेमाल किया जा सकता है। और भी कई उपयोग हैं।
क्या आप इसे अपने घर पर भी करेंगे ? अपनी अगली पीढ़ी के लिए पसंदीदा काम ? उनके लिए शाबाशी के बहाने।
“यदि हमारी अगली पीढ़ी को पर्यावरण प्रेमी बनाना है, तो हम सभी को अभी तुरंत पर्यावरण प्रेमी होना होगा।''
******
इको ब्रिक कैसे बनाएं ?
1. एक खाली बोतल में भरकर बनाएं।
2. उसमे भरा जाने वाला प्लास्टिक भी सूखा होना चाहिए।
3. वैसी प्लास्टिक को वरीयता दी जानी चाहिए जिसका हम पुन: उपयोग नही करनेवाले हैं या पुनर्चक्रन (रीसायक्लिंग) के लिए नहीं देनेवाले हैं।
4. बड़े प्लास्टिक छोटे-छोटे टुकडे करके उसमे भरें।
5. सरिया या छड से दबा-दबा कर कसकर भरें।
6. न केवल घर के बल्कि अपने आस-पास से भी प्लास्टिक को इकट्ठा करने में भी कोई दिक्कत नहीं है।
7. यह सार्वजनिक स्थानों पर समूह अभियान चलाकर किया जा सकता है।
******
इको ब्रिक बनाने के लाभ
1. ईधर-उधर पडे हुए प्लास्टिक / पानी की बोतलों का सही उपयोग किया जाता है।
2. बड़ी संख्या (300-400) में प्लास्टिक को बोतल में बंद कर दिया जाता है।
3. प्लास्टिक से भरी एक बोतल सौ वर्ग फीट जमीन को क्षतिग्रस्त होने से बचाती है।
4. जमीन को नुकसान नहीं होगा।
5. नालियां नही भरती।
6. प्लास्टिक खाने से जानवर नहीं मरेंगे।
7. तालाब प्रदूषित नहीं होंगे ।
8. नदी प्रदूषण का एक प्रमुख कारण नियंत्रित किया जाएगा।
9. समुद्र , समुद्री मछली और समुद्री तल में पाए जानेवाले जीव, , अन्य पौधों आदि नष्ट नहीं होंगे ।
10. मिट्टी खराब होने के कारण, भोजन और फलों में प्लास्टिक के अंश दिखाई देने लगे हैं। इसपर नियंत्रण पाया जा सकता है।
11. यह एक बहुत ही सरल कार्य है। घर के बडे लोग, महिलाओं और बच्चों के लिए यह करना संभव है।
12. इसमें कोई खर्च नही होता।
13. इसे घर में बनाकर घर में ही इस्तेमाल किया जा सकता है।
14. सौंदर्य उत्पाद बनाए जा सकते हैं।
15. उपयोगी चीजें बनाई जा सकती हैं।
16. ऐसी चीजें बनाई जा सकती हैं जो विकल्प हो सकती हैं।
17. जमीन और पानी के अलावा, हवा में फेलनेवाले गंध भी कम हो जाते हैं ।
दीर्घकालिक लाभ
18. कचरा प्रबंधन के संदर्भ में यह एक बहुत ही उपयोगी कदम है।
19. पर्यावरण के प्रति जागरूक समाज बनाने का एक बड़ा अभियान।
20. जब तक कि आपका समाज पर्यावरण के प्रति जागरूक नहीं हों जाता और उद्योग जगत में प्लास्टिक को संसाधित करने के लिए पर्याप्त सुविधा एवं तकनिक नही आ जाती तब तक यह एक बढ़िया विकल्प उपलब्ध है ।
******
एकत्रित इको ब्रिक से क्या किया जा सकता है ?
1. सौंदर्य उत्पादों को घर पर बनाया जा सकता है।
2. घर का फर्नीचर बनाया जा सकता है।
3. घर के बगीचे में गार्डन टाइम्स के रूप में इसका उपयोग किया जा सकता है।
4. एक सार्वजनिक उद्यान में बैठने के लिए बगीचे बनाए जा सकते हैं।
5. घर, बगीचे या चौक में लगाने के लिए आकर्षक मूर्तियां बनाई जा सकती हैं।
******
उदाहरण
1. इसका उपयोग परिसर की दीवारों की सजावट में किया जाता है।
2. पॉलिसी रिसर्च फाउंडेशन दिल्ली ने घर के फर्नीचर बनाने का काम शुरू किया है।
3. हुबली शहर ने प्लास्टिक मुक्त बनाने के लिए इसे ही विकल्प चुना है ।
4. इको ब्रिक्स का उपयोग करके देहरादून में एक पूर्ण उद्यान का निर्माण किया गया है।
5. मध्य प्रदेश में, इसका उपयोग फुटपाथ ब्लॉक के रूप में किया गया है।
6. हरियाणा में, पूरी तरह से भरे हुए ईको ब्रिक्स के बदले में तीन कपडे कि थैली खरीदने की योजना है।
******
एक बहुत ही महत्वपूर्ण निवेदन: -
किसी भी कचरे का प्रबंधन करते समय , खासकर खतरनाक कचरे के मामले में...
सबसे पहला कदम है " इंकार (रिफ्यूज) " इसका मतलब है पूरी तरह से अस्वीकार ।
दूसरा कदम " कम से कम उपयोग (रिड्यूस) " करना है ।
तीसरा कदम " पुन: उपयोग (रियूज) " है।
चौथा चरण " पुनर्चक्रन (रीसायक्लिंग) " है ।
इको ब्रिक्स का विकल्प तीसरे और चौथे श्रेणी (कदम) में आता है। लेकिन वर्तमान परिस्थिति में उपयोग में लाने के लिए, उपलब्ध विकल्पों में यह सबसे अच्छा लगता है।
******
अब हम सभी के लिए एक सवाल है: -
क्या हम समस्या वृद्धि का एक हिस्सा बनेंगे?
या
हम इसके समाधान में भाग लेंगे ?
#paryavaransamrakshan#ecobrickchallenge
Comments
Post a Comment