कोरोनाचे पाच टप्प्यांमध्ये वर्गीकरण
कोरोनाचा पाच टप्प्यांमध्ये मुकाबला
--------------------------------------------------
एक काळ असा होता जेव्हा एक कोरोनाबधित रुग्ण सापडला तर एक किलोमीटर त्रिज्येचा प्रदेश पूर्ण बंद केला जायचा. रूग्ण जेथे गेला असेल त्या हॉस्पिटलला सुद्धा बंद केले जायचे. आता केवळ रुग्णाच्या घराला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले जाते. आजाराचे स्वरुप जसजसे कळत गेले तसतसे उपायाचे मार्ग सोपे सोपे होत गेले. भीतीचे सावट कमी होऊन उपचारात सुलभता येऊ लागली आहे.
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि पावलापावलावर आपल्याला मदत करणारे समाजातील सर्व आदरणीय जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स ज्यांना आपण आपले फॅमिली डॉक्टर म्हणतो, ते सुद्धा आता टेबलवर पेशंटला घेऊन पाहू लागले आहेत. परस्परांची चर्चा आणि माहितीच्या आधारावर उपचाराचा एक क्रम आणि एक पद्धती आपोआप तयार होऊ लागली आहे. प्रशासन आणि सीनियर डॉक्टरांची मदत होत आहे. सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांना अनुकुलता प्राप्त होण्यासाठी पुढे येत आहेत.
कोरोणाच्या संकटाला परास्त करण्यासाठी त्याचे व्यवस्थापन आणखी उत्तम होण्यासाठी एक सोपा मार्ग, त्याची वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागणी करणे!
सध्याच्या माहितीनुसार आपण त्याची पाच टप्प्यांमध्ये विभागणी करू शकतो.
अजून सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ''कोरोणा म्हणजे मृत्यू !"असेच गणित घट्ट बसले आहे. त्यामुळे त्यांना अत्यंत टोकाचे भय वाटते आहे.
काही लोकांना समजले आहे की, बरेच रुग्ण बरे होतात. फक्त डॉक्टरकडे जायला नको ! कारण ते ऍडमिट करतील. जेवढे भय कोरोनाचे, तेवढेच भय ॲडमिट करण्याचे! एडमिट म्हणजे आयसीयू... एडमिट म्हणजे महागडी औषधे... महागडी औषधे म्हणजे साईड इफेक्ट.... प्रचंड खर्च आणि प्रचंड अनिश्चितता.... आणि त्यात रुग्णाला पाहायलाही मिळत नाही ....अगदी मेल्यावर सुद्धा! यासंबंधीचे निर्माण झालेले भय. या भयाने आजच्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये खूप मोठी भर टाकली आहे.
या कारणासाठी सुद्धा पाच स्टेजेसमध्ये त्यांची विभागणी करणे फारच उपयोगी ठरेल.
स्टेज वन
काही लक्षणे नाहीत. फक्त कोरोना बाधित रुग्णाच्या सानिध्यात दीर्घकाळ राहण्याचा योग आला म्हणून तपासणी केली आणि टेस्ट पॉझिटिव्ह आली.
अशा रुग्णांना केवळ आयसोलेशन आणि आयसोलेशन मध्ये आपली शारीरिक, मानसिक आणि पाचन स्थिती चांगली ठेवणारे उपाय करणे. फार फार तर विटामिनच्या गोळ्या घेणे. नियमित व्यायाम करणे यांचा समावेश होऊ शकतो.
या स्टेज मधल्या महत्त्वाच्या तीन गोष्टी ; एक टेस्ट करून घेणे, स्वतःला आयसॉलेट करणे आणि फॅमिली डॉक्टरच्या संपर्कात राहणे.
फॅमिली डॉक्टर्सनी लोकांना सर्वतोपरी मदत करीत असताना, स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तोंडावर मास्क, हाताला आणि अंगावर अप्रन आवश्यक आहे. वरचेवर हात धुण्याची प्रक्रिया आणि अधून मधून सोडियम क्लोराइड आणि सनिटेशन एवढं ही पुरेसा आहे.
स्टेज टू
या स्थितीत आपल्याला ताप, खोकला, घशामध्ये खवखव, मलप्रवृत्ती, डोकेदुखी यासारखी लक्षणे असतील तर डॉक्टरांच्याकडून उपचार घ्यावे लागतात. आणि उपचार व्यवस्थितपणे घेऊन वरील स्टेज वन मधील सूचनांचे ही पालन करणे. दोन किंवा तीन दिवसातून डॉक्टरांच्याकडून तपासणी करून घेणे.
घरातील आणि संपर्कातील अन्य लोकांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे. आवश्यकतेनुसार त्यांनासुद्धा फॅमिली डॉक्टरकडे घेऊन जाणे.
डॉक्टरांची भूमिका त्यांना ठाऊक असतेच!
स्टेज थ्री
सामान्य औषधाने लक्षणे कमी होत नाहीत, असे असेल तर त्याला स्टेज थ्री म्हणावे. अँटिबायोटिक आणि इंजेक्शन्स कधीकधी सलाईन सुद्धा द्यावी लागतात.
ऑक्सिजनचे कॉन्सन्ट्रेशन 90 च्या खाली आलेले असते, तेव्हा त्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या सहाय्याने 95 च्या वरती ठेवावे लागते.
यामध्ये खुली हवा, भरपूर पाणी आणि सुक्ष्म व्यायाम, पालथे झोपणे या रुग्णाला करता येण्यासारख्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
डॉक्टरांची भूमिका या अवस्थेमध्ये अत्यंत अत्यंत महत्त्वाची असते. अवस्थेत लोकं हा दररोज डॉक्टरांच्या खाली येणे अत्यंत आवश्यक असते मग ते फॅमिली डॉक्टर का असेनात!
स्टेज फोर
वरील सर्व गोष्टी करून सुद्धा ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागणे, याचा उल्लेख या स्टेजमध्ये करावा लागतो.
इथून पुढे हॉस्पिटलचा शोध घेणे आवश्यक आहे. आपल्यासाठी आवश्यक असलेल्या बेडची पूर्तता होईल, असे ठिकाण शोधून ते मिळेपर्यंत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा प्राप्त करणे. डॉक्टरच्या नियमित संपर्कात राहणे, तासातासाला ऑक्सिजन तपासत राहणे. सिक्स मिनट वॉक टेस्ट करीत राहणे. सहा मिनिटाच्या आत सामान्य चालल्यानंतर आपला ऑक्सिजन तीन किंवा चार परसेंटने खाली येत नाही ना, हे पहात राहणे. बाकी वेळेमध्ये ऑक्सिजनचा सतत वापर करीत राहणे, या गोष्टी केल्या तर कॉम्प्लिकेशन्स थोडे कमी होतात.
,,, पण येथे जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे फॅमिली डॉक्टरची भूमिका संपलेली असते.
स्टेज फाईव्ह
हा अत्यंत क्लिष्ट टप्पा आहे. या टप्प्यावर हा पेशंट दवाखान्यातच असायला हवा. त्याला आयसीयूमध्ये ठेवायचे किंवा नाही ठेवायचे, हा तज्ज्ञ डॉक्टरचा प्रश्न आहे. त्याला कोणती औषधे सुरू करावयाची हा सुद्धा त्यांचा एक प्रश्न आहे. या टप्प्यावर डॉक्टरांना त्यांचे काम मुक्तपणे करू देणे, त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकणे आवश्यक आहे. अन्य काही पर्यायच नसतो. अनेक पर्यायांची चाचपणी केली असता काम बिघडू शकते.
याचे फायदे खालील प्रमाणे :-
1. अति टोकाचा तनाव, तणावामुळे होणारा रुग्णांचा आणि त्याचा परिवार इति लोकांचा गोंधळ वाचवता येणे शक्य आहे.
2. त्यावर कशा प्रकारे व्यवस्थापन केले पाहिजे, यासंबंधीचे गाईडलाईन्स तयार करणे शक्य आहे.
3. पहिल्या तीन टप्प्यांपर्यंतचे प्रशिक्षण जनरल प्रॅक्टिशनर व फॅमिली डॉक्टरना देणे शक्य आहे.
4. तिसऱ्या आणि पाचव्या टप्प्याच्या मध्ये काही इंटरमिजिएट सुविधा निर्माण करणे शक्य आहे. त्यांना गाईडलाईन्स देऊन त्यांच्याकडून रुग्ण बरे होईपर्यंतच्या स्थितीत सांभाळणे शक्य आहे.
5. मानसिक तणाव आणि सामाजिक तणाव मुळे निर्माण होणारे गोंधळ आणि अव्यवस्था या गोष्टी टाळणे शक्य आहे.
धन्यवाद समग्र माहिती बद्दल.
ReplyDelete