तत्त्व चिंतन १

" काय उपयोग आहे??? काय उपयोग आहे सगळं चांगलं करून??? कुणाला किंमत आहे त्याची???... वापरून घेतात सगळे वापरून घेतात सगळे.... वापरून घेतात!'' अत्यंत रागारागाने आणि तावातावाने   अभिलाष बोलत होता. त्याच्या वाक्यावरून आणि त्याचा अविर्भाव आवरून सगळा इतिहास लक्षात येत होता. काय घडले असेल???
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे प्रसंग येतात. सज्जन सदाचारी लोकांना तर खूप वेळा अनुभवावे लागते.  कॉल पण असे घडल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय असते बरे???
  भालचंद्र काकांच्या अस्तित्वानेच ते जिथे  असतील, येथील वातावरण शांत आणि प्रसन्न होत असते. काकांच्या जवळ आला  तसा  अभिलाष सुद्धा थोडा  शांत झाला... मग काका त्याला सांगू लागले,
" हे बघ अभिलाष,  असे प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. आपण खूप मन लावून काम करतो.  आपण खूप चांगल्या भावनेने काम करतो. आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. परंतु  आपल्या अपेक्षाप्रमाणे आपलं कौतुक होत नाही. तेव्हा विचार करण्यासारख्या तुला पाठवतो तेव्हाच करा दोन गोष्टी आहेत. पहिला विचार हा आपण जे काम करतो ते कुणा व्यक्तीसाठी अथवा स्वतःच्या कौतुकासाठी करत नाही,  आपण करतो ते काम पूर्ण होण्यासाठी, हे काम चांगलं होण्यासाठी, आपले तसे भाव झालेले असतात म्हणून!  पण आपले  भाव तसे होतात कारण आपण तसे सद्गुणी सदाचारी संस्कारी असतो ना म्हणून!
आता त्याचे आपल्याला तात्काळ फळ मिळावे कौतुकाचा रूपाने ही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.तसे असू नये.कारण एक तर आपण या सत्कर्माचे रचना फळ तात्कालिक कौतुकाच्या मोलाने संपवू नये. त्याचे मोल "खूप मोठे" असते.

        दुसरी गोष्ट आहे, असा प्रसंग आपल्यावर आलाच का बरे? त्याचा विचार करण्याची...
कर्म सिद्धांतानुसार "नामकर्म" आणि त्याचे प्रकार  ही एक वैज्ञानिकांनाही आश्चर्यचकित करेल अशा प्रकारची संकल्पना अत्यंत विस्तृतपणे मांडली आहे. त्यामध्ये " अशुभ कर्मांचा" उदय असताना  त्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते. या कलमाची स्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते स्थिती संपली कर्म संपले की अशी परिस्थिती निर्माण होत नाही. तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतो.  चिडचिड, आक्रस्ताळेपणा केल्यामुळे आपले नुकसान होऊ शकते.
मुळात या कलमाचा बंध पडतोच कसा? हे सुद्धा पाहणे अत्यंत उपयुक्त आहे. दुसऱ्यांच्या गुणांविषयी उदासीनता अथवा हेटाळणी चा भाव आपल्या मनामध्ये आला आपल्या वाणीमध्ये व्यक्त झाला अथवा कृतीमध्ये दिसून आला तर असे कर्म बांधले जाते.
 
       संयम ठेवण्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काय करायचे असेल तर...
दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करायला शिकले पाहिजे. त्यांचे मोकळ्या मनाने कौतुक केले पाहिजे. स्वतःच्या गुणांचा प्रदर्शन करणे सुद्धा टाळायला पाहिजे. दुसऱ्यांचे दोष झाकण्याचे कौशल्य सुद्धा प्राप्त केले पाहिजे. हे सर्व करता आले म्हणजे त्याला "उपगुहन'' असे म्हणतात. हे सम्यक्त्वाचे तिसरे अंग आहे.

      आपल्या व्यवहारांमध्ये आणि विचारांमध्ये वरील प्रमाणे सुचिता आपण आणू शकलो तर अशा प्रकारचे कर्म पुन्हा बांधले जाणार नाही त्याचे भोगावे लागणार नाहीत आणि आपल्या अशा व्यवहारामुळे समाजामध्ये आणि महत्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या मनामध्ये जो सन्मान आणि आदर मिळेल तो "बोनस'' आहे असे समजावे.
शुभम भवतु।''
   

-----------

Comments

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)