जनरल प्र्याक्टिशनर

संकटाच्या समयाला मनुष्याला उपयोगी पडते ती त्याची अंगभूत शक्ती ,त्याचे कौशल्य, त्याचा आत्मविश्वास, त्याची निर्णयक्षमता, जीवन उद्दिष्टा विषयीची त्याची मनोभूमिका! बाहेरून मिळालेली मदत अथवा उसणी मागवलेली शक्ती यांची सुद्धा मदत होऊ शकते,परंतु त्याला खूप मर्यादा असतात.

जसे मनुष्याचे तसेच समाजाचे!

संकटाच्या वेळेला समाजामध्ये कोणती अंगभूत शक्ती आहे? शक्तीचे काय वैशिष्ट्य आहे? त्या शक्तीला जागृत करण्याची कार्यपद्धती आहे? झालेल्या का शक्तीला वापरण्याचे कौशल्य काय आहे?  म्हणजे अधिकाधिक परिणाम  कारक पणे संकटाचा सामना करता येईल?
 हे समजणे म्हणजे खऱ्या अर्थाने व्यवस्थापन कौशल्य असे म्हणता येईल. "योजकस्तत्र दुर्लभ" म्हणतात, ते यामुळेच!
 
       कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आज प्रकर्षाने स्मरण होते आहे की आरोग्यावर आक्रमण करणाऱ्या  आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला  बाधित करणाऱ्या या शत्रूला ठरवायचे असेल तर सार्वजनिक प्रयत्नांबरोबरच अधिक महत्त्वाचे आहेत वैयक्तिक सहभाग आणि तो वैयक्तिक सहभाग मिळवण्यासाठी त्याच क्षेत्रातील (वैद्यकीयक्षेत्रातील) प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक व्यक्तीची संबंधित असणारा घटक कोणता?  तर तो आहे फॅमिली डॉक्टर...   ज्याला आजचा भाषेमध्ये जनरल प्रॅक्टिशनर असे सुद्धा म्हणतात.
 जनरल प्रॅक्टिशनरस ची खालील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत.
1. समाजात मिसळून राहिलेली व्यवस्था
2. कुटुंबाशी घनिष्ट नाते
3. मोठी संख्या
4. भौगोलिक व्यापकता
5. लवचिकता 
6.वरिष्ठांना आदर देण्याचा स्थायीभाव
7. स्वस्त
8. गरजवंत
9. भयमुक्त
10.समाजाचा आदर प्राप्त

 या सर्व गोष्टींचा लाभ  परिणामकारकपणे घ्यायचा असेल तर...
1.त्याला सुविधा द्याव्यात कमी खर्चात येतायेत
2. सौरक्षण द्यावे  (कोविड ची बाधा झाली तर दोन लाख इतके पुरे )
3. प्रोत्साहन
4. सन्मान
5. सहभाग
6. निर्णय प्रक्रियेत स्थान
7. संवाद साखळी
8. प्रशिक्षण

 जर केले तर अनेक लाभ होतील...
1. परिणाम कारक
2. जागृती चे काम
3. सर्व दुर 
4. समाजांतर्गत पूर्व स्थापित असल्यामुळे   गतीमानता
5. प्रतिबंधात्मक काम
6. सौम्य अवस्थेत उपायोजना
7 .योग्य सल्ला
8. भयमुक्ती
9. संवाद साखळीचा भाग बनल्यास  योग्य रुग्णाला त्वरित योग्य ठिकाणी पोचविण्याचे मार्गदर्शन
10. दीर्घकालीन लाभ 
11.  सर्व आपत्तीच्या वेळी उपयुक्त व्यवस्था निर्माण

         प्रशासन , समाजातील वैद्यकीय व्यवस्थेचा मालक न बनता , सहाय्यक व उत्तम व्यवस्थापक बनू शकले  तर समाज अंतर्गत असलेली व्यवस्था अधिक सुदृढ  होऊन दीर्घकालीन उपयोगाची आणि प्रत्येक संकटकाळी सक्षमपणे तोंड देणारी बनू शकते. कोरोणाची आपत्ती तसे करण्यासाठी आपत्ती न बनता इष्टापत्ती ठरू शकते.

Comments

  1. समाज आणि आरोग्य व्यवस्था या दोघांमधला फॅमिली डॉक्टर हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. तो अबाधित राहायला हवा आजच्या करोणा महामारी च्या काळात ही गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. डॉ. मनोज आपण याबाबत खूप सुंदर विश्लेषण केले आहे.

    ReplyDelete
  2. अत्यन्त समर्पक विवेचन...समाजासाठी काही काम केलं पाहिजे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)