कोरोनामुक्ती नंतर रूग्णांसाठी
कोरोनाचे भय हळूहळू कमी होऊ लागले आहे. वैद्यक शास्त्राच्या प्रत्येक घटकाला नवा आत्मविश्वास प्राप्त होऊ लागला आहे. लोकांनी सुद्धा कधी काय करायचे कधी काय करायचे नाही याचे धडे घेतले आहेत. आता रुग्णालया मधले बेड मोकळे राहू लागले आहेत. पॉझिटिव रुग्णांची संख्या क्रमाक्रमाने खाली येत आहे. मृत्यूचा दर सुद्धा पूर्वीपेक्षा कमी होत आहे.
असे झाले... म्हणजे कोरोनाचे संकट टळले, असे मात्र नाही. याहून स्वस्तात उपचार करता येतील का? याहून लवकर उपचार करता येतील का? कोरडा रूग्णांच्या मृत्यूचा दर शून्यावर आणता येईल का? कोरोना ने आपल्याला जे धडे शिकवले ते आत्मसात करता येतील का? त्यातून काही स्थाई विकासाची मुल्ले अमलात आणता येतील का? जा व्यवस्था आणि प्रक्रिया यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाले ते तसेच टिकवता येतील का? अशा अनेक प्रश्नांची होकारार्थी उत्तरे आपल्याला शोधायची आणि अमलात आणायची आहेत.
एक तातडीचा प्रश्न आहे पोस्ट कोवीड लक्षणे शारीरिक बदल आणि त्यांचे उपाय. पोस्ट कोवीड म्हणजे कोवीड इन्फेक्शन होऊन गेल्यानंतर होणारे शरीरातील बदल त्यामुळे निर्माण होणारी लक्षणे आणि आजार.
टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार 87.5 टक्के रुग्ण कोविंड च्या काळामध्ये ज्या लक्षणांना सामोरे गेले त्यापैकी कोणत्या ना कोणत्या संलक्षण आणि पुढील काळामध्ये सुद्धा त्रस्त राहण्याची शक्यता आहे.
आज आपण सभोवताली पाहिले तर
सामान्य अशक्तपणा
घशामध्ये खवखव
खोकला
विशेषतः रात्रीच्यावेळी त्रास देणारे सर्दी
चव न लागणे
वास न येणे
सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविद नंतरच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी चार पाणी प्रोटोकॉल प्रसिद्ध केला आहे.
जसे पिटीइ म्हणजे पल्मोनरी थ्रम्बो एम्बोलिझम ची चर्चा सर्वत्र आपल्याला ऐकायला मिळते आहे. त्याप्रमाणे अन्य अनेक विषय क्रमाक्रमाने आपल्यासमोर येत चाललेले आहेत. उदाहरणार्थ
पचनसंस्थेवर होणारे परिणाम
रक्तप्रवाह संस्थेवर होणारे परिणाम
रक्तशुद्धीकरण संस्थेवर होणारे परिणाम
मूत्रवह संस्थेवर होणारे परिणाम
श्वसनसंस्थेवर होणारे परिणाम
स्मरणशक्ती वर होणारे परिणाम
लैंगिक शक्ति वर होणारे परिणाम
असे असले तरीसुद्धा सर्वच त्रास एकाच व्यक्तीला होणार आहेत असे मुळीच नाही. कोणत्या ना कोणत्या यासंदर्भातले त्रास झाल्याचे भविष्यकाळात लक्षात आले तर त्याचे मूळ covid-19 इन्फेक्शन मध्ये आहे असे असू शकते. याचा विचार आपले डॉक्टर करतील. म्हणून आधीच घाबरलेल्या व्यक्तीने आणखी घाबरण्याची आवश्यकता मुळीच नाही.
अशी उदाहरणे देखील आहेत.... प्राचार्य चव्हाण सर 67 वर्षाचे अजून सुद्धा, पॉझिटिव्ह असून सुद्धा परिवारातील अन्य सदस्यांची काळजी घेण्यामध्ये अग्रेसर राहिले होते त्यांना इन्फेक्शन चा त्रास ही कमी झाला होता आणि त्यांचे covid-19 नंतरची लक्षणे सुद्धा कमीच आहेत. नांद्रे गावाहून आलेले पाचोरे अजोबा ज्यांचे वय 76, वजन 95 , आणि मधुमेहाने ग्रस्त असून सुद्धा, एच आर सी टी चा स्कोर 19 इतका असून सुद्धा त्यांनी सर्व आजारावर पूर्णपणे मात केलेली आहे.
सर्वंकष अभ्यास केल्यानंतर हे लक्षात येते की, हे दृष्टपरिणाम टाळण्यासाठी आपल्याला कोविद बाधित होऊन बरे झाल्यानंतर खालील गोष्टींची काळजी घ्यावी सकललागणार आहे.
1. सार्वजनिक ठिकाणी पाडावयाच्या नियमांचे पालन अधिकच काटेकोरपणे करीत राहावे.
2. आपला आहार अल्प, सात्विक आणि पौष्टिक अशा स्वरूपाचा असायला हवा.
3. कोविड मधून बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला आठवड्याला ... नंतर पंधरा दिवसांनी आणि नंतर एक महिन्याने या डॉक्टरांच्या कडे तपासणी साठी जाणे आवश्यक आहे.
4. आपले नित्य काम सुरवातीला पन्नास टक्के इतक्या प्रमाणात करावे ,नंतर हळूहळू त्याच्यामुळे वाढ करत पूर्वी इतके काम करायला हरकत नाही.यासाठी किमान 15 ते 30 दिवसाचा कालावधी लागू शकतो .
5. व्यायामाचे प्रमाण ही पूर्वीपेक्षा निम्मे असाव. त्यामध्ये सुद्धा आपल्या प्रकृतीला मानवणाऱ्या व्यायामाची निवड करावी. श्वसनाच्या व्यायामाला अधिक महत्त्व आहे.
6. आजारातून(रिकव्हर) बरे झाल्यानंतर मूळशारीरिक शक्ती (रीगेन ) पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपण अत्यंत हळुवारपणे(ग्रॅज्युल) वाटचाल करायला हवी.
7. येणाऱ्या हिवाळ्यामध्ये अधिक मोठी आव्हाने समोर येण्याचा संभव आहे अशी चर्चा सुरू आहे. पण मुळीच घाबरण्याची आवश्यकता नाही. घाबरणे हा मुळी उपायच होऊ शकत नाही. पण तरीही उपाय करणे शक्य आहे. योग्य अशी दिनचर्या जी आयुर्वेदाच्या 'अष्टांगसंग्रह ' ग्रंथामध्ये ' ऋतूचर्या' या प्रकरणांमध्ये पणे सांगितलेली आहे .त्याचा अवलंब करण्यासाठी आपण त्याचा अभ्यास कराव.... त्याच्या साठी आवश्यक ती तयारी करावी आणि त्याचे पालन करावे.
8. आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडी तयार झालेल्या असतात.त्या अँटीबॉडी म्हणजे कोरोणावर मात करणाऱ्या भविष्यातील रुग्णांसाठी शस्त्रास्त्रे आहेत . या शस्त्रास्त्रांचे गरजू माणसाला वितरण करण्याचा मार्ग... 'प्लाजमा डोनेशन' आहे. हे आपल्यासाठी सामान्य रक्तदाना प्रमाणेच आहे . फक्त ब्लड बँकेसाठी याच्यामध्ये थोड्या अधिक प्रक्रिया /प्रोटोकॉल चा अवलंब केला जातो. ज्याना ज्याना शक्य आहे त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे.
म्हणजे कोरोना चा पूर्ण पराभव करणे शक्य आहे.
Comments
Post a Comment