कोरोनाकडे आता नव्या दृष्टीने पाहायला हवे

कोरोनाकडे आता नव्या दृष्टीने पाहायला हवे
------------------------------------------
      
 कोरोना आता "कम्युनिटी स्प्रेड" या स्थिति  मध्ये आला आहे. गेला 4 महिन्याच्या अनुभवावरून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.... 
       पहिली गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने त्याचा संसर्ग होण्यास संबंधीचे व्हिडिओ प्रसारीत झाले होते तितक्या भयानक पद्धतीने त्याचा प्रसार होत नाही.  केवळ कॉन्टॅक्ट म्हणजे व्यक्तीने हात लावलेल्या वस्तुस आपला स्पर्श होणे इतक्या सहजपणे त्याचा  संसर्ग होत नाही."कंटीन्यूअस क्लोज कॉन्टॅक्ट" ही त्याहून वेगळी गोष्ट आहे. काही मिनिटे  सलग,खूप जवळ, खूप वेळा आणि खूप लोकांशी संपर्क येणे याला कंटीन्यूअस क्लोज कॉन्टॅक्ट असे म्हणता येईल. आपल्या जीवनातले सर्व व्यवहार या गोष्टी टाळून करणे शक्य आहे. जे लोक घरातून बाहेर जातात त्यांनी परत आल्यानंतर विशिष्ट नियमांचे पालन केले तर  घरातील अन्य लोकांना बाधा होण्याची शक्यताही कमी होते. उदाहरणार्थ बाहेरचे कपडे घराबाहेरच ठेवणे. घरामध्ये प्रवेश करताना स्वच्छ हात पाय धुऊन घरी जाणे इत्यादी...
     दुसरी गोष्ट आहे , की त्याचा मृत्यू दर दोन टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. म्हणजे आपल्या देशाचा विचार केला तर सतरा लाख प्रभावित लोकांच्या  मध्ये  34 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. याच सुद्धा न तपासलेल्या लोकांची संख्या वाढू शकते म्हणजे  कीती पैकी 34 हजार? तर  मृत्यूचे प्रमाण अजून कमी असल्याचे दिसून येते. यापुढे जाऊन विचार केला तर झालेल्या मृत्यू पैकी सर्व लोक कोरणा ने बाधित होते हे खरे असले तरी त्यांचे अन्य रोगाने बाधित असणे जसे रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, मानसिक कमकुवतपणा, वयाचा जेष्ठ पणा या कारणांचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे. हे पाहता मृत्युदर हा अजून कमी मानायला हवा. म्हणून याबाबतचे भय कमी होण्यास पुरेशे कारण आहे.
     तिसरी गोष्ट आहे आपल्या देशांमध्ये निर्माण झालेल्या उपचारांच्या सुविधा त्यांचे संकलन आणि संघटन करण्यामध्ये पुरेसा वेळ मिळालेला आहे त्याची! आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर व्हेंटिलेटरस तयार झाले आहेत. व्हेंटिलेटर ठेवण्याच्या जागा निश्चित झाल्या आहेत. सर्व समाजामध्ये  सुरक्षित शारीरिक अंतर, स्वच्छता,  सैनीटायझर चा उपयोग यासंबंधी पुरेशी जागृती झालेली आहे. इतकेच काय  इन्फ्रा रेड थर्मामीटर आणि पल्स ऑक्सी मिटर यांच्या वापरासंबंधी ही जागृती झालेली आहे. सरकार, आरोग्य व्यवस्था, कोविड  हॉस्पिटल्स, प्रायव्हेट नर्सिंग होम, जनरल प्रॅक्टिशनर, फॅमिली डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्था आणि समाज या सर्वांना आपापल्या भूमिकेची जाणीव झाली आहे.( यामध्ये ज्या कमतरता राहिल्या असतील त्या पूर्ण करायला अजूनही वाव आहे.) यासंबंधी पसरविल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये तथ्य कोणत्या गोष्टी मध्ये आहे कोणत्या गोष्टी मध्ये नाही? कोणती गोष्ट गांभीर्याने घ्यायला हवी कोणती गोष्ट गांभीर्याने घेऊ नये? माहितीच्या अति प्रसाराच्या या काळामध्ये कोणत्या माहितीला कसा प्रतिसाद द्यावा? कोणत्या माहितीचे काय दुष्परिणाम झालेले आहेत या सगळ्यांची जाणीव सर्वांना होत आहे हे सर्व पाहता  आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला कोवीड कडे वेगळ्या दृष्टीने पाहायला हवे.
       कोरूना प्रतिबंधक लसीची चर्चा सर्वत्र आहे. ती जेव्हा येईल तेव्हा येईल.  पण सध्यातरी आपण आपल्या प्रतिकार शक्ती च्या सहाय्याने कोरूना वर मात केली असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. अशी मात केलेल्यांची संख्या सुद्धा मोठी असणार आहे . त्यांच्यामध्ये  रेजिस्टन्स निर्माण झाला असेल.  असे अनेक जणांच्या बाबतीत झाले असेल तर त्याला मास रेजिस्टन्स असे म्हणतात. हीसुद्धा एक मोठी आशादायक शक्यता आहे.
        वरील तीन  चार कारणांमुळे हे सहज लक्षात येते की,  तो आजार आपल्या दहशतीने त्रस्त करण्यासारखा आहे असे मुळीच नाही. त्याचवेळी आत्तापर्यंत जे खबरदारीचे उपाय केले गेले ते वाया गेले असा अर्थ होत नाही. त्या खबरदारीचा उपाय यामुळेच आपण कोबीच्या कम्युनिटी स्प्रेड या स्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम झालो आहोत. तो आजार श्वसनवहसंस्थेला म्हणजे  फूफ्फुसाला खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण करतो हे सिद्ध झाले आहे,  तो  कंटीन्यूअस क्लोज कॉन्टॅक्ट ने असतो हेही सिद्ध झाले आहे. या प्रकारचे  रोगी खूप प्रमाणात वाढले आणि ते वैद्यकीय यंत्रणेला पेलू शकले नाहीत तर अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते याचे दर्शन इटलीमध्ये जे घडले त्यावरून सगळ्या जगाला झाले आहे. त्यामुळे कोणीही याला दुर्लक्षित करू शकत नाही हेही तितकेच खरे आहे.
      आपल्याला आपल्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याचा विचार करूनच जगावे लागणार आहे. याचे भान ठेवूनच  व्हाट्सअपआपले नित्याचे व्यवहार ,आपला व्यवसाय,  सर्व काही करावे लागत. कोणते व्यवहार अत्यावश्यक आणि कोणते कमी आवश्यक याच्या सुद्धा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिथे जे नियम केलेले असतील त्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे. या शिवाय माणुसकीचा भाव जिवंत ठेवून व्यवसाय करावा लागणार आहे. ज्यांचे रोजगार हरपले आहेत त्यांना नवीन रोजगाराच्या संधी शोधाव्या लागल्या आहेत. त्यासाठी त्यांना काही गुंतवणूक आणि काही वेळ सुद्धा लागणार आहे तोपर्यंत ज्यांचे जीवन स्थिर आहे ज्यांचे उत्पन्न पुरेसे आहे त्यांनी आधार देणे आवश्यक आहे. संपूर्ण जगच एक कुटुंब आहे, समाजातला प्रत्येक जण माझा बांधव आहे असे मानणाऱ्या आपल्या देशामध्ये सर्व काही सुरळीत होण्यामध्ये कोणतीच अडचण नाही.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)