राष्ट्रीय सणानिमित्त...

भारत माता की जय!

 राजकीय नेत्यांचे " अंध समर्थक " आणि  "अंधविरोधक" , "अंधभक्त " आणि " गुलाम'' असे काही शब्द रूढ झाले आहेत. हे शब्द टीका करण्यासाठी वापरले असले तरीही यात काही प्रमाणात वास्तव आहेच. 
 प्रत्येकाने आपले आपले आत्मपरीक्षण करून ठरवावे हे जास्त चांगले.  
अशा प्रवृत्तीचे अस्तित्व देशाच्या प्रगती मधला एक अडथळा  बनू शकतो.   वस्तुतः  हे सर्वजण देशावर प्रेम करणारे आहेत.  "प्रेम करतात तरीही त्रासदायक ठरतात " हे काही बरे नाही !

 15 ऑगस्ट 2020 .

 लाल किल्ल्यावरून " आपला नेता " किंवा " त्यांचा नेता" बोलतोय असे कधीही समजू नये.  देशाचे प्रधानमंत्री बोलतायत,  ते कधी ही विसरू नये. 
 अमर्याद माहितीचे स्त्रोत
 गहन अध्ययन
 आणि चतुर आकलन
 याचा सार असते ते भाषण!
 त्यामध्ये प्राप्त केलेल्या उपलब्धीचं प्रदर्शन असतं.
 कोणत्या पक्षाचे सरकार आहे,  त्या पक्ष्यांचं नसते ते यश... 
 ते भारत सरकारचे यश असतं.
 ते भारतीय जनतेच  यश असत.
( त्यात काही अपयश असेल तर तेही आपलंच असतं)
 ते बाहेरच्या देशांना विश्वास देत.
 आणि भारताच्या जनतेला आत्मविश्वास!
 ते जे बोलणारे असतात ,  ते " मोदी "किंवा " इंदिरा " नसतात.
 ते भारताचे "प्रधानमंत्री" असतात.
 त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही प्रभाव दिसणार अपरिहार्य आहे.
 त्यांना आपणच बहुमताने निवडलेल असत.
 पण ते केवळ"भाषण" नसतं.
 ते एक " व्हिजन" असतं
 एक "मिशन" असतं
  त्या व्हिजन आणि मिशनचा ते एक "दिशादर्शन" असतं.
  कधी एक वर्षासाठी... कधी काही वर्षासाठी... कधी दशका साठी कधी शतकासाठी  त्यामध्ये एक "अंगुलीनिर्देश" असतो.
  त्या व्हिजन च्या प्रकाशात आपल्याला आपलं मोशन करायचा असतं.
 त्या "मिशन " शी आपल्या जीवनाचं " मिशन" जोडायचं असतं.

 खूप विषय असू शकतात विकासासाठी  आणि खूप खूप वाटा... आपण आपल्या क्षेत्र  आणि आपली वाट निवडून त्यामध्ये वाटचालीसाठी तयार राहायचं असतं. त्याच साठी त्यामध्ये "दिशादर्शन" असतं.
 त्यामध्ये असलेल्या " अंगुलीनिर्देश",  यांचा अर्थ समजून घ्यायचा असतो. त्यातल्या प्रत्येक टप्प्यासाठी स्वतःचा एक संकल्प करायचा असतो. त्या संकल्पासाठी तत्परतेने सक्रिय व्हायचं असतं.

 ते प्रधानमंत्री चे भाषण असतं. जगाच्या दृष्टीने तो भारताचा आवाज असतो. भारताच्या क्षमता,  योग्यता आणि  शक्तीचा तो आरसा असतो. शत्रूसाठी चेतावणी असते. मित्रांसाठी आश्वासन असतं. ते आपल्यालाच खरं करून दाखवायचं असतं.  ते सत्य ठरवणं आपलंच काम आहे. असत्य ठरलं तर ते आपलंच अपयश! आपला संकल्प आणि आपली सक्रियता यासाठी इथली व्यवस्था सहाय्यक बनावी त्या सर्व व्यवस्था साठी ते एक आवाहन असतं.

 त्या कार्यक्रमात लहान मुलांना बोलवणे एक संस्कार करण्याचा प्रयत्न असतो.  त्यांच्यामध्ये जाऊन विसरणार त्या संस्काराचा दृढीकरण करण्याचा प्रयत्न असतो.  त्याची फळ आपल्याला काही वर्षांनी मिळणार असतात. कोरोना सारख्या परिस्थितीत हे टाळण  जे आले आहेत   दुरूनच अभिवादन करन समाजशास्त्राचे एक सूत्र असतं आणि लगेच नाका-तोंडावर गमछा ओढणं एक " अर्थशास्त्र" सुद्धा असतं.

 सकारात्मक मांडणी
 सकारात्मक भावना
 सकारात्मक त्याचे अर्थ
 सकारात्मक त्याचे विश्लेषण
असे झाले सारे काही तर तर..
आपले आणि आपल्या देशाचे भवितव्य सुद्धा सकारात्मकच असणार असणार, यात काय संशय? 

     व्यक्तिकेंद्रित राजकारण आणि व्यक्तिकेंद्रित विचारप्रक्रिया या कडून आता आपण देश केंद्रित राजकारण आणि देश केंद्रित विचारप्रक्रिया याकडे वळू शकू का?

Comments