वंदन ...अभिनंदन ...अभिवादन



*वंदन ...अभिनंदन ...अभिवादन..!* 
     
      आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनापासून अभिवादन करावे असे वाटते आहे.

       आपला आपला पोटापाण्याचा उद्योग... आपली नोकरीचे ठिकाण.... व्यवसायाचे काम.... घरातल्या जबाबदाऱ्या... या सगळ्यांच व्यवस्थापन करत करत 
आपल्या पृथ्वी मातेच्या प्रेमाचे  पांग फेडण्यासाठी 
स्वतःला कष्टवणाऱ्या,
झीजवणाऱ्या 
आणि त्याग करणाऱ्या 
सर्व कार्यकर्त्यांना आज मनापासून अभिवादन करावस वाटतं आहे.
      
       त्यांच्या त्यांच्या आवडीचा विषय असो, 
झाडाचा असो, पाण्याचा असो, 
कचऱ्याचा असो
पक्षांचा असो
प्राण्यांचा असो 
आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये, 
आपल्या आपल्या ठिकाणाहून सुरुवात करून
समविचारी चार लोकांना एकत्र करून 
पर्यावरणाला पूरक अशा सर्व विषयांची ज्योत तेवत ठेवणार्या  सर्व कार्यकर्त्यांना  मनापासून सलाम करावा असे वाटते.

     क्वचित कौतुक आणि बऱ्याचदा हेटाळणी,
क्वचित सन्मान आणि बऱ्याचदा गैरसमज, 
क्वचित अनुकूलता आणि बऱ्याचदा अडथळे... 
कुणाला काही छोटसं काम सांगायला जावं तर भलं मोठं लेक्चर  ऐकायची पाळी. येतो येतो करतो करतो म्हणून गोड गोड बोलणारे कामाच्या वेळी दांडी म्हणतात तेव्हा सगळेच काम आपल्या अंगावर पडतात तेव्हा धावून धावून काम पूर्ण करा ना आणि केवळ समाधान घेऊन परत  येण. 
        या सगळ्या मधून या विषयाचा संस्कार पुढच्या  पिढी पर्यंत येणाऱ्या  सर्व कार्यकर्त्यांना प्रणाम करावा असं वाटतंय.

           खूप मोठी वेळेची गुंतवणूक ,
 स्वतःचा पेट्रोल स्वतःचा, 
पैसा जमेल तेवढा खर्च करून, 
 आणि याच गोष्टी थोड्या प्रमाणात दुसऱ्याकडून मिळवत असताना झालेल्या प्रचंड यातना 
दृश्य स्वरूपात  किंचीतस यश आणि बऱ्याचदा मोठ मोठ अपयश, भ्रमनिरास... 
पण तरीसुद्धा नेताना काम पुढे ठेवण्याचा अविरत खटाटोप करणाऱ्या,
  न पगार,ना पेन्शन, ना कसले अधिकार , ना कसले मानधन  ना कसले रेकग्नेशन... तरीसुद्धा  वेळेवर हजर, वेळेवर काम पूर्ण,सरकारी अधिकाऱ्यांसमोर विनम्रपणे (आपली नव्हे) पर्यावरणाची बाजू मांडून सुद्धा, निमुटपणे पदरी पडेल ते घेऊन येणारे,चिवटपणे, अथकपणे,  निरंतर झगडणारे  कार्यकर्ते! 
आपल्यापर्यंत सोबत काम करून सुद्धा,  मतभेद झाल्यानंतर वेगळे झाल्यावर, "राहे अनेक, मंझिल तो एक है l"असे म्हणून कार्य सुरूच ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना माझा मनापासून नमस्कार!
      
    व्यक्ती तितक्या प्रकृती, काम कोणते करावे?  प्रथम कोणते करावे काम?  कसे करावे? सुरुवात कुठून करावी?...  यासंबंधी अनेक मत-मतांतरे असतानासुद्धा, 
पर्यावरणाच्या कामाचा  महारथ,  सहस्त्र अश्‍वांनी खेचला जावा त्यापद्धतीने  आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने सर्व विश्वाला प्रकाशित करणाऱ्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या महामोहिमेस आपापल्या परीने योगदान देणाऱ्या सर्व कार्य क्षेत्रातल्या सर्व कार्य विभागातल्या सर्व  कार्यकर्त्यांना विनम्र अभिवादन!
       
     पोटच्या मुलाची वाढत असणारी शक्ती पाहून,
 त्याच्या प्रयत्नाने होणारी प्रगती पाहून, 
त्या प्रगतीचे प्रशस्तीपत्र मिळाल्यावर  झालेला सन्मान पाहून,  वृद्ध मातापित्यांना ज्याप्रकारे आनंद होत असतो, 
त्याच प्रकारचा आनंद होत पृथ्वी मातेनं होत असेल.  समाधानाच्या भावनेने मंदस्मित  करत आपल्याकडे पाहत असेल. चुका करणाऱ्या लेकरांचा कान  पिरघळता पिरघळता अत्यंत आशेनं  आपल्याकडेच पाहत असेल. तिच्या अमृत आशीर्वादाने आपण वाटचाल करत  राहणाऱ्या सर्व भूमिपुत्रांना दंडवत!
       
       सर्वांना उत्तम आयुरारोग्य, सुख-शांती-समाधान, धनसंपदा, ऐश्वर्य सन्मान...  सर्व काही प्राप्त होऊ दे! सर्वांची सर्व स्वप्न सार्थ होऊ देत.....!
 शुभम भवतु !
 शुभम भवतु !
 शुभम भवतु !

Comments

  1. Corona gives idea to human plz shut down all activities atleast one weak in year it give lot to nature

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समीक्षा सारांश

दोष मिल गया

"संवाद" या पुस्तकावरून...(2)