करंज
जसा जसा उन्हाळा
कडक होत जातो,
आणखीनच निखरत जातं
रस्त्याकडेचं हिरवं सोनं!
चकित करतं मनाला
कसं येतं ऐन वेळेला?
हवं तसं रूप घेऊन
ते करंज्याच लेणं.
उन्हाळ्याच्या रखरखीत
हे गारव्याच गाणं .
शांत करतं मनाला
रूप त्याचं देखणं.
अरे,हिरव्याचे सुद्धा
रंग किती वेगळे वेगळे!
एकापेक्षा एक सरस
असे पाचूचे सोहळे .
आणखी काही दिवसांनी
येतात जांभळी पांढरी फुले !
हिर्यानी आणि मोत्यांनी
जणु शालूला सजवले.
नववर्षाच्या स्वागताला
पडे चांदण्यांचे सडे.
गूढ त्यांचे कसे
कोणालाच ना कळे.
मनाला थंड करणारं झाड
आता फळ देऊ लागतं.
तरुणपणातल्या धडपडीनंतर
जणु प्रौढ शहानपण येतं.
फळांमध्ये बीज स्निग्ध
औषधी गुण त्याचे फार.
त्वचेसाठी, पिकासाठी
गुराढोरांसाठी वरदान.
पण हल्ली थांबायला
जरा वेळ नाही कुणाला.
तरी जागा हवी असते
गाडी आपली ठेवायला.
सावलीच देणं पाहून
किती जणांना आठवतं?
आणखी अशी झाडे आपण
नकोत का लावायला?
आणखी अशी झाडे आपण
नकोत का लावायला?
वैद्य मनोज पाटील
वर्ष प्रतिपदा,2024.
Comments
Post a Comment