जेन झी
*जेन झी*
-------------
अडकू नको "अभिमन्यू",
पुन्हा चक्रव्यूहामध्ये
हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे!
निर्माणाच्या आकांक्षा आहेत तुझ्याकडून
विध्वंसाच्या हाकेला बोल तू "नाही रे "
दवबिंदूसारखं काही क्षणात तुझं लक्ष उडून जातं,
त्याच दवबिंदूमध्ये नयनरम्य प्रतिमाची आस आहे तुझ्याकडून.
स्पंज्यासारखं शोषून घेतोस सहज तू तंत्रज्ञान
तोच ओलावा घेऊन नापीक झालेल्या जमिनीला
सुपीक बनवण्याची अपेक्षा आहे तुझ्याकडून.
ध्रुवासारखा हट्ट कर,
पण यावेळी थोडा बदल कर,
भारतमातेसाठी अढळपद माग...
स्वतःसाठी नाही रे!
अभिमन्यूसारखा अडकू नको पुन्हा चक्रव्यूहामध्ये,
हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे!
निर्माणाच्या आकांक्षा आहेत तुझ्याकडून,विध्वंसाच्या हाकेला
बोल तू "नाही रे "
कमलपत्रासारखा पाण्यात ही वेगळा राहतोस तू.
तरीसुद्धा कल्पनेच्या गावांमध्ये निवांत रमतोस तू.
शिवरायांसारखा
यवनांपासून धरतीचं दुरित दूर करण्याची शपथ कधी करशील तू?
विवेकानंदासारखा
शाश्वताची ओढ घेऊन
रामकृष्णाच्या शोधार्थ कधी निघशील तू?
पाण्यासारखा निर्मळ तू,
झर्यासारखा खळखळ तू,
धबधब्यासारखा नृत्यरम्य प्रवास तू...
शेतामधल्या पाटासारखा पिकांना पोसण्यासाठी
कधी वाहशील तू?
तुषार आणि ठिबक सिंचनाच्या वाटा चोखाळून
धन आणि धान्याच्या भव्य राशी
कधी उभारशील तू?
मधमाशासारखा माहिती तंत्रज्ञानाच्या पोळ्याजवळ
घोंगावणाऱ्या तुला शपथ तुझ्या आईची आहे रे...
अभिमन्यूसारखा अडकू नको पुन्हा चक्रव्यूहामध्ये
हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे!
निर्माणाच्या आकांक्षा आहेत तुझ्याकडून
विध्वंसाच्या हाकेला बोल तू "नाही रे "
सिद्धार्थ गौतमासारखा,
वर्धमान महावीरासारखा...
जगातल्या दुःखांच्या अंताकरिता,
अण्वस्त्रांच्या निर्मूलनाकरिता,
कट्टरवाद्यांच्या खातम्याकरिता,
पर्यावरणाच्या रक्षणाकरिता,
तुझ्याच उद्याच्या अस्तित्वाकरिता
गरज तुझी आहे रे...
अभिमन्यूसारखा अडकू नको पुन्हा चक्रव्यूहामध्ये
हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे!
निर्माणाच्या आकांक्षा आहेत तुझ्याकडून
विध्वंसाच्या हाकेला बोल तू "नाही रे "
वैद्य मनोज पाटील
दिनांक 28 /9 /2025
*जेन झी*
अटक मत जाना "अभिमन्यु",
फिर उस चक्रव्यूह के भीतर,
यह युद्ध उतना अपरिहार्य नहीं है l
सृजन की आकांक्षाएँ हैं तुमसे,
विनाश की पुकार को कहना तुम
"नहीं रे,कतही नहीं रे"!
ओस की बूँदसी कुछ क्षणमें दृष्टि भटक जाती तेरी,
फिर भी नयनरम्य छवि की चाह है तुमसे।
स्पंज-सा सोख लेते हो सहज कोई तकनीक,
उसी रस से बंजर धरा को
फिर उपजाऊ बनाने की आशा है तुमसे।
ध्रुव-सा अचल संकल्प करो,
पर इस बार थोड़ा बदलाव करो,
माँ भारती के लिए अडिग पद माँगो...
अपने लिए नहीं रे!कतही नहीं रे !
मत फँसना फिर "अभिमन्यु",
उस चक्रव्यूह के भीतर,
यह युद्ध उतना अपरिहार्य नहीं रे!
सृजन की आकांक्षाएँ हैं तुमसे,
विनाश की पुकार को कहना तुम
"नहीं रे,कतही नहीं रे"!
कमल-पत्र सा जल में रहकर भी अलग रहते हो,
फिर भी कल्पना के गाँवों में विचरते रहते हो।
कब करोगे प्रतिज्ञा शिवबा जैसी?
धरती से यवनों का दुरित हटाने की?
कब बढ़ोगे विवेकानंद-से,
'शाश्वत सत्य'की प्यास लिए,
रामकृष्ण की खोज में?
तुम निर्मल हो जैसे जल,
खिलखिलाते हो झरने-से,
नृत्य करते धधकते प्रपात से...
पर पाट की धारसे खेतों को पोषण देने
कब बहोगे तुम?
तुषार और टपक सिंचाई की राह पकड़कर
धन और अन्न की विराट राशियाँ
कब रचोगे तुम?
मधुमक्खी-से गूंजते रहते हो
सूचना-तकनीक के छत्तों के पास,
पर भूल मत जाना शपथ है माँ की तुम पर रे!
मत फँसना फिर "अभिमन्यु"
उस चक्रव्यूह के भीतर,
यह युद्ध उतना अपरिहार्य नहीं रे!
सृजन की आकांक्षाएँ हैं तुमसे,
विनाश की पुकार को कहना तुम
"नहीं रे,कतही नहीं रे"!"!
सिद्धार्थ गौतम-से,
वर्धमान महावीर-से...
दुनिया के दुखों का अंत करने के लिए,
अणुशस्त्र के विनाश के लिए,
कट्टरता की समाप्ति के लिए,
पर्यावरण के रक्षण के लिए,
कल के अपने ही अस्तित्व के लिए
जरूरत है तुम्हारी रे...
मत फँसना "अभिमन्यु"
उस चक्रव्यूह के भीतर,
यह युद्ध उतना अपरिहार्य नहीं रे!
सृजन की आकांक्षाएँ हैं तुमसे,
विनाश की पुकार को कहना तुम
"नहीं रे,कतही नहीं रे"!"!
वैद्य मनोज पाटील
दिनांक 28/9/2025
Gen Z
Do not be trapped like Abhimanyu,
again in the whirl of war’s illusion.
This battle is not inevitable, my friend—
The world awaits creation from your hands,
Say “No” to the call of destruction!
Your mind drifts like a dewdrop in the wind,
yet within that drop lies a vision of beauty.
Like a sponge, you absorb technology with ease;
may that same moisture turn barren lands
into fertile fields of hope.
Be steadfast like the Northern Star,
but change your course this time.
Ask for strength not for yourself,
but for Mother India’s eternal pride.
Do not be trapped like Abhimanyu,
this war is not the only way.
The world awaits creation from your hands,
Say “No” to the call of destruction!
You float untouched like lotus on water,
yet wander carefree in villages of imagination.
When will you, like Shivaji,
swear to protect this soil from evil’s shadow?
When will you, like Vivekananda,
seek truth beyond the fleeting,
in search of the divine like Ramakrishna?
Pure as water,
melodious as a flowing spring,
dancing as a waterfall—
when will you become the quiet stream
that nourishes the farmer’s fields?
Walking the paths of droplets and irrigation,
when will you raise mountains of harvests,
wealth, and abundance?
Hovering like bees around the hive of technology,
remember your mother’s oath—
do not be trapped again in the whirl,
this war is not inevitable.
The world awaits creation from your hands,
Say “No” to the call of destruction!
Be like the Buddh, like Mahavir
for the end of sufferings,
for the abolition of nuclear fire,
for the fall of fanatic hatred,
for the protection of the earth,
for the tomorrow that is yours to breathe.
You are needed now more than ever.
Do not be trapped like Abhimanyu,
this war is not inevitable.
The world awaits creation from your hands.
Say “No” to the call of destruction!
-Dr Manoj Patil.
28/09/2025रसग्रहण
१. कवितेचा आशय :
वैद्य मनोज पाटील यांच्या या कवितेत "अभिमन्यू" हे प्रतीकात्मक पात्र आहे. महाभारतातील अभिमन्यूसारखा युवक पुन्हा विध्वंसक चक्रव्यूहामध्ये अडकू नये, असे आवाहन कवी करतो. युद्ध, हिंसा, विध्वंस हे जीवनाचे अनिवार्य सत्य नाही; उलट निर्माण, शांती, विज्ञानाचा उपयोग, पर्यावरणसंवर्धन, मानवी मूल्यांची जपणूक हीच खरी जीवनाची दिशा आहे. शिवाजी, विवेकानंद, बुद्ध, महावीर यांच्या प्रेरणेतून युवकांनी जगाला समृद्ध, शाश्वत आणि शांततामय करण्यासाठी कार्य केले पाहिजे, हा संदेश कवितेतून व्यक्त होतो.
२. कवितेचा प्रकार :
ही कविता प्रेरणादायी, सामाजिक आणि राष्ट्रवादी स्वरूपाची आहे. यात उपदेश, आवाहन, आणि उदात्त आदर्श यांचा संगम आहे.
३. अलंकार :
रूपक अलंकार : "कमलपत्रासारखा", "ध्रुवासारखा", "दवबिंदूसारखा" – युवकाच्या विविध गुणांची तुलना निसर्गातील वस्तूंशी
उपमा अलंकार : "पाण्यासारखा निर्मळ तू", "झर्यासारखा खळखळ तू".
अनुप्रास अलंकार : "धन आणि धान्याच्या भव्य राशी" – ध्वनीसौंदर्य.
प्रतीक अलंकार : चक्रव्यूह = विध्वंसक परिस्थिती, अभिमन्यू = आजचा युवक, शिवाजी/विवेकानंद = प्रेरणास्त्रोत.
४. रस :
वीर रस : युवकाला लढाऊ पण सृजनशील बनण्याचे आवाहन.
शांत रस : बुद्ध, महावीर यांच्या उदाहरणातून शांती व अहिंसेचे अधिष्ठान.
भक्ती रस : भारतमातेप्रती समर्पणाची भावना.
५. भावनिक मूल्य :
कविता युवकांच्या मनात आत्मचिंतन जागृत करते. केवळ संघर्ष नव्हे तर सृजनशीलता, विज्ञानाचा सकारात्मक उपयोग, पर्यावरणाचे संरक्षण, समाजहित, व विश्वशांती ही खरी गरज आहे, हे ठसवते.
६. काव्यगत वैशिष्ट्ये :
समृद्ध प्रतीकांचा वापर (कमलपत्र, ध्रुव, दवबिंदू, स्पंज, मधमाशी).
इतिहास आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम (शिवाजी, विवेकानंद, बुद्ध, महावीर).
युवकाला थेट उद्देशून केलेले संवादात्मक शैलीतील लेखन.
पुनरुक्ती प्रयोगातून संदेशाला बळकटी – "अभिमन्यूसारखा अडकू नको पुन्हा चक्रव्यूहामध्ये, हे युद्ध तेवढे अनिवार्य नाही रे!"
७. संदेश :
आजच्या युवकाने विध्वंसक प्रवृत्तींपासून दूर राहून, विज्ञान-तंत्रज्ञान, शेती, पर्यावरण, शांती, मानवता यांच्या आधारे नवीन जगाची निर्मिती करावी. संघर्षापेक्षा निर्माण हेच खरे ध्येय आहे.
✅ एकंदरित ही कविता युवकांना दिलेला सृजनशीलतेचा, राष्ट्रनिष्ठेचा आणि शाश्वत भविष्याचा प्रेरणामंत्र आहे.

Comments
Post a Comment