गणित कुठेतरी चुकतं आहे.
गणित कुठेतरी चुकतं आहे.
----------------------
आपल्या नाकातलं शेंबूड काढायला
प्रत्येक जण प्रत्येक वेळी
दुसऱ्या कुणालातरी बोलवतं आहे.
गणित कुठेतरी चुकतं आहे.
कुणाची समस्या कोणीतरी मांडतो
कुठलीशी एजन्सी सोडवायला नेमतो
हाही दुकान मांडतो तोही दुकान मांडतो
दुकानदारांचं नाणं चलतं आहे.
कुंपणाने शेत खावं असं का बरं व्हावं?
चारित्र्याचं नाणं का झाकळून जावं?
कर्तव्यांचे स्मरण सुद्धा राहिले नाही
जो तो अधिकाराचीच भाषा बोलतो आहे
समाजाचे प्रश्न समाजातच सुटावेत
अशी व्यवस्था समाजातच असावी
व्यापाऱ्यांनी बनवल्या विशेष व्यवस्था
ती व्यवस्थाच आपल्याला नाडवत आहे.
शरीराचं कसं बरं छान चालतं!
हात पाय हृदय मेंदू आपला आपलं काम करतं.
सृष्टीकडून, देहाकडून शिकायचं सोडून
सागळं त्रस्त आणि रोगग्रस्त बनतं आहे.
कुठे चुकतंय समजून घ्यावं.
समजलंय तर दुरुस्त करावं.
टिकट टिपणी छिद्रान्वेशन
सदा सर्वदा कशाला हवं?
गणित इथंच तर चुकतं आहे.
गणित इथंच तर चुकतं आहे.
Comments
Post a Comment