शब्द माझे
शब्द कधी हसविती आणि शब्द कधी रडविती.
शब्द माझे प्रयत्न करतील, जीवने सुखी करण्यासाठी.
गंध असतो धर्म असतो ,शब्दांनाही दंभ असतो.
शब्द माझे साधन बनतील ध्येय साध्य करण्यासाठी.
वेदनांची महाकाव्ये आणि त्यांची दुकानदारी.
शब्द माझे ती मोडतील, शांत जगाला करण्यासाठी.
शब्द कधी मनोरंजन, आणिक कधी ज्ञानरंजन.
शब्द माझे बीज होतील नवनिर्माण करण्यासाठी.
Comments
Post a Comment