गंध वेडा
गंधवेडा
-------
श्वासां चा गंध तुझा
मी घेऊन धुंद झालो.
धावणारा मी पहा
थोडासा मंद झालो.
ओघळणाऱ्या त्या बटाना
हलकेच बोटाने नीट कर ना
पाहून तिरकेच मजकडे
एक छोटे स्मित कर ना.
शब्द तुझे झेलण्याला
कान माझा अधीर झाला.
त्या शब्दांचे गीत होतील
त्यास मजला गाऊ दे ना.
क्षण माझे सार्थ होती
अर्थ लाभतो जीवनाला
मजसवे तू जिंदगी भर
हात हाती देऊन चाल ना
पैंजणा चे नाद ऐकून
मन लागे नाचण्याला.
नाद त्यांचा, सूर त्यांचा
ऐकून मज दंग होऊ दे ना.
-डॉ मनोज पाटील
तू अग्निबाण माझे
मी "उपग्रह" आहे
कोठे नेऊन ठेवायचे
हाती तुझ्याच आहे.
आई बाबा प्रक्षेपण केंद्र
अन मित्र इंधन माझे
सर्व कर्तव्य पूर्त व्हावे
हीच भावना आहे.
Comments
Post a Comment