प्रवासाचा आनंद घ्यावा

प्रवासाचा आनंद घ्यावा
..............................

जीवनाच्या प्रवासात
एकांताचा वेळ मिळावा.
कोणी सोबत आला तर 
अवश्य येऊ द्यावा.

अनुभूतीचा संचित ठेवा
द्यावा अथवा घ्यावा.
अथवा ''सोबत " हाच एक
उन्मुक्त "अनुभव" व्हावा.

ताजा ताजा सूर्यप्रकाश
अन् मातीचा मंद वास
पहाटेचा गारवा अथवा
अस्तित्वांचा आवाज खास

फुलपाखरू फुलांसोबत अथवा
आत्ममग्न आकाश पाखरांसोबत
सहप्रवासी अन् स्वतंत्र निवासी
एकाच समयी दोहोंचा अनुभव घ्यावा.

तपश्चर्या अनिवार्य असे...
लादलेली वा निवडलेली.
प्रत्येक क्षण तृप्त व्हावा
प्रवासाचा आनंद घ्यावा.

प्रवासाचा आनंद घ्यावा.

Comments