पुरस्काराच्या निमित्ताने...

पुरस्काराच्या निमित्ताने...
---------------------------------
      पुरस्कार मिळाल्याचे समजले तर सर्वजण अभिनंदन करतात.पण पुरस्कार दिल्याचा हेतू जर साध्य व्हायचा असेल तर दोन गोष्टी घडायला हव्यात असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे ज्यानी पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केली त्याबद्दल त्यांचं कौतुक व्हायला हवं. ज्याला पुरस्कार मिळाला आणि ज्या कारणासाठी पुरस्कार मिळाला योग्य कामाचा अधिक विस्तार व्हायला हवा.
  पुरस्कार देण्याचे अनेक उद्देश असू शकतात. चांगल्या गुणांचा गौरव व्हावा हा त्यातला पहिला आणि सार्थ उद्देश असावा. समाजामध्ये चांगलं कार्य करत असणाऱ्या लोकांच्या मध्ये एक मैत्रीचं नातं निर्माण होतं.
तसं होत असेल तर ते हव आहे.
 
  पुरस्कार प्राप्त व्यक्ती पुरस्कार मिळाला तर ते पुरस्कारयोग्य काम अधिक प्रतिष्ठा पावते, ते काम करण्यासाठी त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली प्रेरणा ही एक महत्वाची गोष्ट असते. प्रेरणा जिवंत राहावी यासाठी असणारी परिस्थितीसुद्धा कारणीभूत  असते. परस्थिती समाजामध्ये असलेली एखादी समस्या असू शकते. पण "समस्या" सदैव राहावी असे मात्र कुणालाच वाटणार नाही. पण ही समस्या सोडवण्यासाठी सुरुवात करावी असे ज्याला वाटते त्याला कारण मात्र त्याच्या आई-वडिलांचे गुरुजनांचे  संस्कार असू शकतात. कधीकधी ही प्रेरणा समाजातील अशाच एका पुरस्कार प्राप्त व्यक्तीचे उदाहरण असू शकते. त्यामुळे पुरस्काराला पात्र व्यक्ती निर्माण करण्याचे कार्य सुद्धा पुरस्कार देण्याचा प्रयत्न होतो त्यातून होत असते असे सिद्ध होते. जी व्यक्ती आपल्या कामाला सुरुवात करते...काही अंतर चालून जाते तेव्हा त्या  वाटचालीमध्ये त्याला मित्र भेटतात आणि त्या मित्रांच्या मुळे त्याचे कार्य सतत चालू राहते. ती अत्यंत महत्त्वाची प्रेरणा असते. असे मित्र प्राप्त होणेसुद्धा पुरस्काराचं एक फलीत म्हणायला काय हरकत आहे? सामान्यतः हा पुरस्कार देण्यासाठी ज्या आदर्श भावना असतात, पुरस्कार प्राप्त होण्यासाठी चे कार्य करण्यामध्ये सुद्धा आदर्श भावना असतात.  या ''आदर्श भावना" सदैव जिवंत राहिल्या पाहिजेत. नाहीतर ''आजकाल आदर्शांचं काही चालत नाही'', ही भावना समाजामध्ये निर्माण होणे, हे समाजाच्या हिताचे नसते.
      
पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती व त्याचे कार्य पुरस्कार मिळण्यासाठी सुरू केलेले नसते. परंतु त्याने केलेले कार्य हे पुरस्कार देण्याच्या योग्यतेचे आहे , हे पुरस्कार देणाऱ्याने सिद्ध केलेले असते. त्यामुळे महिमकोणाचा असेल तर त्या पुरस्कार दिला मागे असलेल्या भावनेचा आहे आणि पुरस्कारयोग्य कार्य करण्यामागील भावानेचा आहे. ही भावना अधिकाधिक वाढीस लागावी या पुरस्काराचा मुख्य उद्देश असावा.
    काल-परवापर्यंत पुरस्कार घेताना मी खूप घाबरत असे. प्रसिद्ध झाल्यामुळे ज्या समस्या दैनंदिन जीवनामध्ये डोकावतात त्या अडचणींची मला भीती वाटत असे. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये करत असलेल्या कामाचा अधिक विस्तार व्हायला हवा असे मला आता मनापासून वाटू लागले आहे. त्यामुळे कदाचित हा पुरस्कार घेण्याची माझी तयारी  झाली आहे. वैद्यकीय सेवा करताना समोरच्या माणसाला प्रधान मानून काम करण्याची वृत्ती समाजामध्ये वाढायला हवी ही काळाची गरज आहे. माणूस म्हणजे पेशंटवर करा आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा! विविध सेवांच्या नावावर लुटणारे सहकारी मित्र नव्हेत. केवळ प्रोटोकॉल च्या नावाखाली शरीरावर होणारे अत्याचार नको आहेत. रुग्ण रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये विश्वासाचे नाते पुन्हा निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न दोन्हीकडून व्हायला हवेत. तिसरे कोणी तसे प्रयत्न करू लागले तर घोटाळा होण्याचीच शक्यता जास्त आहे.
    
''क्लायमेट चेंज'' ची समस्या आपल्या पिढीला आता भेडसावू लागली आहे आणि पुढच्या पिढीच्या अस्तित्वाच्या मुळावर उठलेली आहे , असे आपल्याला दिसत आहे.आपण काही केले नाही तर आपल्या मुलांचा घात झालेला आपण डोळ्यांनी पाहणार की काय ? अशी भीती वाटू लागली आहे. तसे घडू नये असे वाटत असेल तर पर्यावरणाबाबत ची जागरुकता प्रत्येक घरापर्यंत आणि घरातील प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. या कार्याला अधिक बळ मिळणार असेल तर ज्या पुरस्काराची आवश्यकता आहे.
     सदाचार आणि सहकार्य करण्याची भावना वृद्धिंगत व्हावी त्यासाठी जर्या पुरस्काराची योजना असेल तर पुरस्कार देणार्‍यांचे साठी मनापासून मी आभार व्यक्त करतो . हुतात्मा भगतसिंग यांचे एक विधान मला आठवते, देशाच्या स्वातंत्र्यासाठी किती रक्त सांडले ?माझे रक्त सांडले की नाही? त्याचे रक्त सांडले की नाही? यापेक्षा अधिक महत्त्वाचे हे आहे, की त्या सांडलेल्या रक्ताचा प्रेरणेतून हजारो देशभक्त मातृभूमीसाठी  सर्वस्वार्पण करायला तयार होतात की नाही?...महत्त्वाचा प्रश्न हा आहे.

     मला मिळत असलेल्या पुरस्काराचे, कौतुकाचे श्रेय सर्वप्रथम मी माझ्या आई-वडिलांना देतो. योग्य काय आणि अयोग्य काय याचे योग्य विश्लेषण करण्याचा संस्कार मला त्यांच्याकडूनच मिळाला. त्यानुसार मी वागत गेलो आणि माझ्या वृत्तीचे कौतुक होत गेले. ज्यांनी ज्यांनी कौतुक केले त्या सर्वांचे श्रेय आहे. ज्याच्यामुळे हे सद्गुण माझ्यामध्ये सदैव जिवंत राहिले....तसे पाहायला गेले तर संपूर्ण समाज... समाजातल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी दोन्ही... त्यांना सामोरा गेल्यानंतर मी त्याचा अर्थ चांगलाच आणि चांगल्यासाठीच लावू शकलो. असे प्रशिक्षण मला अनेक व्यक्ती, संस्था आणि प्रक्रियांनी दिले. त्या सर्वांचेच श्रेय आहे. हा पुरस्कार त्यांनाच समर्पित आहे.

Comments